Share

शेतकऱ्यांच्या कापसाची तातडीने खरेदी करा अन्यथा लाॅकडाऊन उठताच मुख्यमंत्र्यांच्या दारात आंदोलन करू

Published On: 

अहमदनगर : यंदा कोरोनामुळे कापुस खरेदी केंद्रे बंद होते. त्यात कारखानदार, व्यापारी कापसाची खरेदी करत नाहीत म्हणून काय कापुस शेतकऱयांच्या घरातच पडून द्यायचा काय, जर खरिपाच्या आधी कापसाची खरेदी करुन शेतकऱयांना पैसे मिळाले नाही तर खरीपावर परिणाम होईल. शिवाय शेतकऱयांना मोठा फटका सोसावा लागेल. त्यामुळे सरकारने शेतकऱयांकडील कापुस तातडीने खरेदी करुन शेतकऱयांचे गुंतलेले पैसै तातडीने मोकळे करुन द्यावेत अशी मागणी शेतकरी मराठा महासंघाचे अध्यक्ष संभाजी दहातोंडे पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. तातडीने दखल घेतली नाही तर लाॅकडाऊन उठले की मुख्यमंत्री, पणन मंत्र्याच्या दारात अंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

कोरोना योद्धांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी सरसावल्या सामाजिक संघटना

कोरोना संकटामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. त्यात कापुस खरेदी होत नसल्याने शेतकरी त्रस्त आहे. राज्यातील आडीच लाख कापुस उत्पादकांचा कापुस खरेदीअभावी घरातच असून सात हजार कोटी अडकले आहेत, खरं शेतकऱयांच्या दृष्टीने ही बाब अत्यंत गंभीर आहे. खरीप हंगाम तोंडावर आला आहे. कापसाच्या पैशावरच खते, बियाणे व अन्य बाबी खरेदी केल्या जातात. आता मागणी नसल्याने कारखानदार व्यापारी कापुस खरेदी करत नाही. सरकारी यंत्रणा याबाबत दखल घेणार आहे की नाही. कापुस खरेदीचे केवळ कागदोपत्रो घोडे नाचवले जात आहेत. प्रत्यक्षात कापुस खरेदी मंद गतीने सुरु आहे.

महाराष्ट्राला मका आणि ज्वारी खरेदीसाठी केंद्र शासनाची परवानगी

अशीच परिस्थिती राहिली तर खरीपापर्यत अर्ध्या लोकांचीही कापुस खरेदी होणार नाही याचा विचार करुन शासनाने तातडीने अजून गरजेच्या ठिकाणी कापुस खरेदी केंद्रे सुरु करुन सरकारने शेतकऱयांची कापुस खरेदी करावी व शेतकऱयांचे गुंतलेले पैसै तातडीने मोकळे करुन द्यावेत अशी मागणी शेतकरी मराठा महासंघाचे अध्यक्ष संभाजी दहातोंडे पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. तातडीने दखल घेतली नाही तर लाॅकडाऊन उठले की मुख्यमंत्री, पणन मंत्र्याच्या दारात अंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

लॉक डाऊन मध्ये हयगय नको व टेस्टिंग वाढवा,उच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!