Share

कोरोना योद्धांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी सरसावल्या सामाजिक संघटना

Published On: 

पुणे : देशभरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असताना देशसेवेत आपले सर्वस्व अर्पण केलेल्या कोरोना योद्धांच्या आरोग्याची काळजी घेणे हे देखील इतकचं गरजेचे आहे. त्यानुसार राज्य आणि केंद्र सरकार या कोरोना योद्धांना मास्क, सॅनिटायझर उपलब्ध करून देत आहेत.

त्याचबरोबर काही सामाजिक संघटना सुद्धा या कोरोना योद्धांच्या आरोग्याची काळजी घेत आहेत. यात मावळ तालुक्यातील अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या व्यक्तीं, नगरपरिषद, कॅन्टोन्मेट बोर्ड, पोलीस स्टेशन, सर्व ग्रामपंचायती आदींना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते पार्थ पवार यांच्याकडून 2700 लिटर सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले. आमदार सुनील शेळके, मावळ तालुका अध्यक्ष बबनराव भेगडे यांच्या हस्ते सुपूर्द तळेगाव नगरपरिषदेसाठी मुख्याधिकारी दीपक झिंजाड यांच्याकडे 100 लिटर सॅनिटायझर सुपूर्द करण्यात आले.

पोलीस देखील माणूसच तोही थकतो, अधिक कुमक लागली तर केंद्राकडे मागणी करणार – उद्धव ठाकरे

तर दुसरीकडे पार्थ पवार सोशल फाउंडेशनच्या वतीने पिंपरी चिंचवड शहरात महानगरपालिका विभाग आणि पोलीस विभागातील विविध कार्यालयात सॅनिटाईझर वाटप करण्यात आले. काही दिवसांपूर्वी फाउंडेशनच्या माध्यमातून शहरातील विविध भागात आणि महापालिका व पोलीस विभागात मास्क चे वाटप करण्यात आले होते. त्यांनंतर शहरातील सर्व भागात ज्या ठिकाणी नागरिकांना जेवणाची अडचण असेल अश्या नागरिकांना जेवणाचे नियोजन आजपर्यंत चालू असून या पुढे पण चालूच राहणार आहे.

परप्रांतीय मजूरांना त्यांच्या राज्यात सुरक्षित पाठवणार; जीव धोक्यात घालून प्रवास करु नका

तिकडे ओरंगाबादमध्ये कोरोना ‘पॉझिटिव्ह’ रूग्णांवर चिकलठाणा येथील जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचार सुरू आहेत. तेथील डॉक्टर व कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी औरंगाबाद राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्यावतीने आज शासकीय जिल्हा रूग्णालयास एक हजार ‘हॅण्ड ग्लोव्हज’ची मदत करण्यात आली. शहरात कोरोना बाधित रूग्णांची वाढत जाणारी संख्या चिंताजनक आहे. कोरोना बाधित रूग्णांवर जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू असून येथील डॉक्टर, कर्मचारी आपला स्वत:चा जीव धोक्यात घालून रूग्णांची पुरेपुर काळजी घेत आहेत. त्यामुळे याठिकाणी असलेल्या डॉक्टर, कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी, सामाजिक जाणिवेतून ही मदत करण्यात आली. आमदार सतीश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने शहरात गरजू नागरिकांना देखील आवश्यक ती मदत करण्यात येत आहे.

मुंबईत देखील राष्ट्रवादी वेलफेअर ट्रस्टतर्फे डॉक्टर्स व पॅरामेडीकल स्टाफच्या सुरक्षिततेसाठी फेस शिल्ड मास्क वितरीत करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, चिटणीस संजय बोरगे व गौरव यांच्यासह नायर हॉस्पिटलचे इंटर्न डॉ. प्रणव शेळके, डॉ. अथर्व सरोदे व डॉ. कडव उपस्थित होते.

अखेर नांदेडचे ‘ते’ ३८ मजूर पुण्याहून रवाना

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!