Share

महाराष्ट्राला मका आणि ज्वारी खरेदीसाठी केंद्र शासनाची परवानगी

Published On: 

मुंबई : राज्यातील मका उत्पादकांना दिलासा देण्यासाठी कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून केंद्र शासनाने मका आणि ज्वारी खरेदी करण्यास परवानगी दिली आहे. त्यानुसार राज्याला २५ हजार मेट्रीक टन मका आणि १५ हजार मेट्रीक टन ज्वारी खरेदी करण्यात येणार आहे.

तूरखरेदीत शेतकऱ्यांना अडचण येऊ देऊ नका, अजित पवारांचे आदेश

यासंदर्भात कृषिमंत्री भुसे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब, उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब यांच्याकडे मागणी केली होती. राज्याने केंद्राकडे त्यासाठी पाठपुरावा केल्यानंतर केंद्र शासनाने परवानगी देणारं पत्र नुकतचं राज्याला पाठविले आहे.

राज्यातील स्वस्त धान्य दुकानांत आता 35 रुपये किलो दराने तूरडाळ

केंद्र शासनाच्या ग्राहक कल्याण, अन्न व सार्वजनिक वितरण विभागामार्फत राज्यात ह्या खरेदीला परवानगी देण्यात आली आहे.केंद्र शासनाच्या भरडधान्य खरेदी धोरणानुसार भारत अन्न महामंडळाच्या (एफसीआय) महाराष्ट्र प्रादेशीक शाखेमार्फत खरेदी केली जाणार आहे. खरेदी केलेले हे धान्य सार्वजनिक वितरण व्यवस्थेमार्फत ग्राहकांना वितरीत करण्यात येणार आहे. या निर्णयामुळे राज्यतील शेतकरी बांधवांना दिलासा मिळणार आहे.

कोरोनाचा विळखा : औरंगाबादेत 28 नवे रुग्ण, एकूण संख्या 349 वर

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!