Share

‘महाराष्ट्राचा नागरिक जगला तरच तो उघड्या डोळ्याने येणारं सरकार पाहू शकेल’

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : राष्ट्रपती राजवटीचा मोठा फटका आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या रुग्णांना बसला आहे. राष्ट्रपती राजवटीमुळे मंत्रालयातील ७ व्या मजल्यावरील मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षाला सध्या टाळे लावण्यात आले आहे. त्यामुळं ५ हजार ६५७ रुग्णांचा जीव सध्या टांगणीला लागला आहे.

मंत्रालयातील मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षा टाळे लागल्याने आज हजारो रुग्ण या मदतीपासून वंचित आहेत. मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षातून मदत मिळण्यासाठी राज्यातील काना कोपऱ्यातून या ठिकाणी येत होते. गेल्या पाच वर्षात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना या कक्षातून तब्बल २१ लाख रुग्णांना १६०० कोटीहून अधिक निधी मिळाला आहे.

मात्र विधानसभा निवडणुकीसाठीची आचारसंहिता लागू झाल्यापासून या कक्षाचे काम रेंगाळले होते. त्यानंतर निवडणूक आयोगाच्या सुचनेनंतरही निवडणुकीच्या काळात कक्षाचे काम झाले नाही. मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिल्यापासून तर कक्षाचे काम पूर्णपणे थांबवण्यात आले आहे. त्यामुळं मदतीच्या अपेक्षेत असलेल्या 5 हजारपेक्षा अधिक रुग्णांचे आयुष्य सध्या अधांतरी असल्याचे दिसून येत आहे.

या प्रकारानंतर राज्यभरातून संताप व्यक्त होऊ लागला आहे. संभाजी ब्रिगेडने यावर आक्रमक भूमिका घेतली असून हा कक्ष पुन्हा सुरु करण्याची मागणी संभाजी ब्रिगेडचे पुणे जिल्हाध्यक्ष संतोष शिंदे यांनी केली आहे. महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवटीमुळे रुग्णांचे प्रचंड हाल होत आहेत. ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी’ च्या माध्यमातून गंभीर आणि अतिदक्षता विभागातील रुग्णांना सरकार कडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या माध्यमातून थेट मदत होते. परंतु ती मदत आज थांबलेली आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून पुण्यातील सर्व हॉस्पिटलमध्ये हजारोंच्या संख्येने रुग्ण येत आहेत. त्यांना मदत मिळाली पाहिजे असं शिंदे यांनी म्हटलं आहे.

रुग्ण जगला पाहिजे, त्याला सरकारकडून हॉस्पिटल पर्यंत थेट मदत मिळाली पाहिजे. म्हणून सध्याच्या राजवटीच्या काळात तात्पुरते ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी’चे नाव बदलून ‘राज्यपाल सहाय्यता निधी’ असे करा…तात्काळ नाव बदलून तात्काळ सरसकट सगळ्या हजारो गरीब रुग्णांना थेट मदत मिळाली पाहिजे अशी संभाजी ब्रिगेडची मागणी आहे. रुग्ण जगला पाहिजे, महाराष्ट्राचा नागरिक जगला पाहिजे तरच तो उघड्या डोळ्याने येणारे सरकार पाहू शकेल असं शिंदे यांनी म्हटलं आहे.

पुढे बोलताना शिंदे म्हणाले,महामहीम राज्यपालांनी रुग्णांना व शेतकऱ्यांना थेट मदत मिळावी यासाठी महाराष्ट्राचा दौरा करावा व राज्यातील हजारो गोरगरीब सर्वसामान्य रुग्णांसाठी ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी’ चे मदतीचे दरवाजे राज्यासाठी खुले करावेतराज्यातील धर्मादाय आयुक्तांना तात्काळ आदेश देऊन प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी विशेष व्यवस्था करावी, *राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा अशी संभाजी ब्रिगेडची मागणी आहे.

भूमाता ब्रिगेडच्या सर्वेसर्वा तृप्ती देसाई यांनी या प्रश्नाबाबत ‘महाराष्ट्र देशा’कडे प्रतिक्रिया दिली आहे. मुख्यमंत्रीपदासाठी आणि सत्तेसाठी सगळ्याच पक्षांमध्ये सध्या चढाओढ सुरू आहे.आणि त्यामध्ये राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झालेली आहे परंतु याचा फटका राज्यातील गोरगरीब गरजू रुग्णांना सुद्धा बसत आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधी मधून मोठी मदत जी आहे ती रुग्णांना होत असते परंतु आता राष्ट्रपती राजवट लागल्यापासून ते कार्यालयात बंद झालेले आहे त्यामुळे या सत्तेसाठी भांडणार्यांमुळे अनेक रुग्णांचे हाल होणार आहेत तसेच अनेक रुग्ण वेळेत उपचार मिळाले नाहीत तर दगावण्याची शक्यता सुद्धा नाकारता येत नाही .त्यामुळे सरकार कोणाचेही बनवा परंतु मुख्यमंत्री सहायता निधी मधून मिळणारी वैद्यकीय मदत राज्यपालांनी त्यांच्या विशेष अधिकारातून तातडीने सुरू करावी असं देसाई यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची भेट घेऊन मुख्यमंत्री सहायता निधीतून गरीब रुग्णांना दिलासा दिला जातो. या निधीचे संचालन राज्यपाल कार्यालयातर्फे करण्यात यावे. पण एकही गरजू रुग्ण मदतीपासून वंचित राहणार नाही, याची काळजी घेणे आवश्यक आहे, अशी विनंती केली आहे. राज्यपाल महोदयांनी सुद्धा यावर तत्काळ कार्यवाहीचे आश्वासन दिले आहे. अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!