मुंबई: राज ठाकरे ज्या लोकांचा इतिहास वाचत आहेत, त्यांच्या लिखानामुळेच महाराष्ट्रात दंगली घडल्याचे संभाजी ब्रिगेडने म्हटले आहे. बाबासाहेब पुरंदरे यांनी केलेले इतिहास लेखन हे दंगलीचे स्त्रोत पसरवणारे लिखाण आहे. त्या माध्यमातूनच महाराष्ट्रात दंगली झाल्या होत्या. असा आरोप संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष मनोज आखरे यांनी केला आहे. पण आपण जरी दंगली घडवत असला तरी संभाजी ब्रिगेड आणि मराठा सेवासंघाच्या विचारधारेमुळे या महाराष्ट्रातील दंगली थांबलेल्या आहेत.
दरम्यान संभाजी ब्रिगेडने राज ठाकरे यांना आव्हान दिले आहे. राज ठाकरे प्रबोधनकार ठाकरेंचे रक्ताचे वारसदार आहेत मात्र संभाजी ब्रिगेड ही वैचारिक वारसदार आहे, असे म्हणत आखरे यांनी राज यांना चर्चेचं निमंत्रण दिलं असून आम्ही खरा इतिहास समोर आणून दाखवू असे म्हटले आहे.
काहीही माहिती नसताना पुरुषोत्तम खेडेकर यांच्याविषयही काहीही वक्तव्य राज ठाकरेंनी केलं आहे. या महाराष्ट्रामध्ये इतिहासाचं विकृतीकरण थांबवून सामाजिक, शैक्षणिक धार्मिक द्वेषवादाचं उच्चाटन करण्याचं काम खेडेकरांच्या विचारांच्या प्रबोधनातून झालं आहे. सर्व बहुजन समाजामध्ये खेडेकर आणि त्यांच्या लिखाणाबद्दल आदर आहे. आपण प्रतिगामी व्यवस्थेचे वाहक आहात. असे म्हणत राज ठाकरेंनी वाटेल ते बोलून महाराष्ट्राला वेठीस धरु नये असे आवाहनही आखरे यांनी केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- अचानक नीरज चोप्राची प्रकृती बिघडल्याने रुग्णालयात दाखल
- मुंडे भगिनी उपस्थित राहिलेल्या कार्यक्रमाच्या बॅनरवरून गोपीनाथ मुंडेंचा फोटोच गायब!
- तालिबान्यांना धक्का ; उपराष्ट्रपति अमरुल्लाह सालेह यांनी स्वतःला कार्यकारी राष्ट्रपती म्हणून केलं घोषित
- ज्या सुविधांचा विद्यार्थ्यांनी वापर केलेला नाही; त्या सुविधांचे शैक्षणिक शुल्क कमी करु, कुलगुरूंची ग्वाही!
- ‘जेलमध्ये टाकलं तरी शर्यत होणारच’; पोलिसांच्या धरपकड कारवाईनंतर पडळकर आक्रमक
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
