Share

समरजीत घाटगेंनी शेतकऱ्यांचा अपमान केला :- हसन मुश्रीफ

Published On: 

कोल्हापूर : महाराष्ट्र राज्याचे नवनिर्वाचित ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे यांच्यातील वाद कोल्हापूर जिल्ह्यासाठी काही नविन नाही. महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होताच या सरकारने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णय घेतला, परंतु कोल्हापूर जिल्ह्यातील खूप कमी शेतकऱ्यांची कर्ज माफ झाल्यामुळे घाटगे यांनी यावर आपली नाराजी व्यक्त केली होती.

जिल्ह्यातील शेतकरी हा स्वाभिमानी व कणखर आहे. कर्जमाफीसाठी राज्य सरकारचा प्रामाणिक हेतू त्यांना माहिती असल्याने ते रक्ताने पत्र कशासाठी लिहील. मात्र, काहीजण राजकीय स्टंटबाजीसाठी असले उद्योग करत असून, त्यातून जिल्ह्यातील स्वाभिमानी शेतकऱ्यांचा अपमान केल्याची टीका ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे यांच्यावर केली.

आज कोल्हापूर येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत मंत्री मुश्रीफ बोलत होते. ते म्हणाले, जिल्ह्यातील शेतकरी हा स्वाभिमानी असल्याने ९५ टक्के वसुली होते. त्यामुळे महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजनेचा लाभ जिल्ह्याला कमी मिळाला. अहमदनगर जिल्ह्यात २५५९ कोटी मिळाले. त्यामुळेच नियमित परतफेड करणा-यांना प्रोत्साहन दिले पाहिजे, यासाठी ५० हजार रुपयांपर्यंत अनुदान देण्याचा निर्णय महाविकास आघाडीच्या सरकारने घेतला असल्याचे त्यांनी सांगितले

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!