Share

समांथाने डिलीट केली घटस्फोटाची पोस्ट,अभिनेत्रीने नागा चैतन्याशी केली का समेट?

Published On: 

मुंबई : दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील पॉवर कपल सामंथा रुथ प्रभू (Samantha Ruth Prabhu) आणि नागा चैतन्य (Naga Chaitanya) यांनी काही महिन्यांपूर्वी वेगळं होण्याबाबत एक पोस्ट शेअर केली होती. मात्र आता अभिनेत्रीच्या एका इंस्टाग्राम पोस्टने सर्वांचे लक्ष वेधले आहे.

दरम्यान समांथाने तिच्या इंस्टाग्राम प्रोफाइलवरून (Instagram profile) घटस्फोटाची (divorce) पोस्ट हटवली आहे. नागा चैतन्य आणि समंथा रुथ प्रभू या दोघांनी २ऑक्टोबर २०२१ रोजी इंस्टाग्रामवर ही पोस्ट शेअर केली होती. मात्र आता ही पोस्ट अभिनेत्रीच्या टाइमलाइनमधून गायब आहे. तर नागा यांनी ही पोस्ट डिलीट केलेली नाही. हे पोस्ट जाणूनबुजून सामंथाच्या प्रोफाईलमधून हटवले गेले आहे की, संग्रहात ठेवले आहे हे स्पष्ट झाले नाही.

तसेच समंथाच्या प्रोफाईलवरून पोस्ट डिलीट केल्यानंतर हे दोघे पुन्हा एकत्र येत आहेत का? असा अंदाज बांधत आहेत. दोघांमध्ये काही सलोखा आहे का? अशा चर्चेस उधाण आले आहे. मात्र, यावर समंथा रुथ प्रभू किंवा नागा चैतन्य यांच्याकडून कोणतेही वक्तव्य जाहीर करण्यात आलेले नाही.

अशी आहे पोस्ट
सामंथा आणि नागा यांनी यापूर्वी अधिकृत निवेदनात लिहिले की, खूप विचारविनिमय केल्यानंतर, चैतन्य आणि मी पती-पत्नी म्हणून वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. दशकानुशतके जुनी मैत्री आमच्या नात्याचा पाया होती हे आमचे भाग्य आहे. आम्हाला खात्री आहे की ही मैत्री आमच्या दोघांमध्ये नेहमीच एक वेगळे बंध ठेवेल. पुढे लिहिले आहे की, आम्ही आमचे चाहते, हितचिंतक आणि मीडियाला या कठीण काळात आम्हाला साथ देण्याचे आवाहन करतो. आणि आयुष्यात पुढे जाण्यासाठी आम्हाला गोपनीयता द्या. तुमच्या सर्वांच्या पाठिंब्याबद्दल धन्यवाद.

समंथा आणि नागा चैतन्य यांचे ऑक्टोबर २०१७ मध्ये लग्न झाले होते. लग्नापूर्वी दोघांनी काही काळ एकमेकांना डेट केले होते. दोघांनी अनेक चित्रपट आणि जाहिरातींमध्ये एकत्र काम केले आहे. आता चार वर्षांनंतर साऊथची ही लोकप्रिय जोडी वेगळी झाली.

महत्त्वाच्या बातम्या

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!