Share

समंथा रुथ प्रभुने वाढवला मानधनाचा आकडा! पहा किती घेणार…

Published On: 

नवी दिल्ली : दाक्षिणात्य अभिनेत्री समंथा रुथ प्रभु हिनं तिच्या अभिनयानं मोठा चाहतावर्ग निर्माण केला. एक अभिनेत्री म्हणून नावारुपास येत असतानाच समंथानं अभिनेता नागा चैतन्यशी लग्नगाठही बांधली.एका प्रतिष्ठीत कुटुंबाची सून म्हणूनही तिच्याकडे पाहिलं गेलं. पण, पुढे  घटस्फोटाला सामोरं गेल्यानंतर ही अभिनेत्री स्वत:साठी वेळ काढताना दिसली. मानसिक आघातातून सावरत असतानाच तिनं कलेची साथ सोडली नाही.

‘द फॅमिली मॅन 2’मध्ये दमदार अभिनय करणारी समंथा आता म्हणे तिच्या कारकिर्दीतील आव्हानात्मक भूमिकांसाठी तयार झाली आहे. नात्यांमध्ये आलेल्या वादळानंतर समंथामध्ये झालेला हा बदल पाहून प्रेक्षकांना तिचा हेवा वाटत आहे.आगामी ‘यशोदा’ या चित्रपटासाठी ती काही साहसदृश्य करताना दिसणार आहे. हॉलिवूडमधील स्टंटमॅन यानिक बेन यांच्यासोबत काम करणार आहे.  समंथानंच एक फोटो शेअर करत यासंबंधीची माहिती दिली.

मानधनाचा आकडा वाढवला

दरम्यान, या चित्रपटासाठी समंथा आधी 2 कोटी रुपये इतकं मानधन घेणार होती. पण, मधल्या काळात तिच्या वाट्याला आलेलं यश पाहता या अभिनेत्रीनं मानधनाचा आकडा वाढवल्याचं म्हटलं गेलं. आता ती या चित्रपटासाठी तब्बल 3 कोटी रुपये इतकं मानधन घेणार आहे.

महत्वाच्या बातम्या : 

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!