🕒 1 min read
ऑस्ट्रेलिया : लॉकडाउन नंतर बरेच पर्यटक फिरताना दिसत आहेत. कोरोनामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. परंतु कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याचं चित्र दिसत आहे. तसेच नवीन ववर्षाचे देखील आगमन होत आहे. त्यामुळे बरेच पर्यटक बाहेर फिरताना दिसत आहेत.
दरम्यान एमटीडीसीने एका बोलू शकता न येणाऱ्या कुटुंबाचा पर्यटनाला आलेल्याचा व्हिडिओ त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर शेयर केला आहे. ‘भावना व्यक्त करायला भाषेची गरज नाही. आमच्या पाहुण्यांना हसताना बघण्यापेक्षा जास्त आनंद आम्हाला कशाचाही होत नाही. या कुटुंबाचं आदरातिथ्य केल्याबद्दल आम्हाला आनंद आहे,’ असं ट्विट एमडीटीसीने केलं.
त्याच ट्विटला रिट्विट करत भारताचा क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे याने महाराष्ट्राबद्दलचे प्रेम पुन्हा एकदा दाखवून दिले आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ म्हणजेच एमटीडीसीने ट्विट केलेल्या एका व्हिडिओवर अजिंक्य रहाणेने प्रतिक्रिया दिली आहे.
अजिंक्य रहाणेनेही एमटीडीसीचं हे ट्विट रिट्विट केलं. ‘पर्यटक आनंद घेत असल्याचं बघून छान वाटलं. महाराष्ट्र पर्यटनासाठी पुन्हा एकदा सुरक्षित करण्यासाठी आणि सगळी काळजी घेण्यासाठी पर्यटन मंडळालाही सलाम,’ असं ट्विट अजिंक्य रहाणेने केलं आहे.
Lovely to see tourists enjoying their visit and kudos to the tourism department for taking all the necessary precautions to make sure Maharashtra is safe for travel again ???????? https://t.co/YLICy687h6
— Ajinkya Rahane (@ajinkyarahane88) December 30, 2020
दरम्यान, ऍडलेडमध्ये झालेल्या लज्जास्पद पराभवाचा बदला भारताने मेलबर्नमधल्या बॉक्सिंग डे टेस्टमध्ये घेतला . ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यामध्ये भारताचा 8 विकेटने विजय झाल. मराठमोळ्या अजिंक्य रहाणेने आपल्या नेतृत्वात टीम इंडियाला विजय मिळवून दिला. रहाणेच्या या नेतृत्वासाठी त्याचं देशासह क्रीडा विश्वातून कौतुकांचा वर्षाव होत आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘प्रिय एनसीबी, ती आली आहे आपण कधी कॉल कराल?’ सचिन सावंतांचा कंगनाला टोला
- राज्यातील तरूण वैफल्यग्रस्त, त्यामुळे तातडीने भरती प्रक्रिया सुरु करा; नाना पटोलेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र
- शाळा सुरू करण्यापूर्वी शाळा व परिसर सॅनिटाइज करा : नीलम गोऱ्हे
- शेतकरी आंदोलनावरून कुमार विश्वास यांनी साधला मोदि सरकारवर निशाणा
- काँग्रेसचं वर्चस्व कमी करण्याचा शिवसेना-राष्ट्रवादीचा डाव; काँग्रेसच्या दिग्गज नेत्याचं थेट सोनिया गांधींना पत्र
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
