Share

रीमाताईंच्या ‘होम स्वीट होम’ला सलमान खानच्या मराठीतून शुभेच्छा…

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा- बॉलीवूड मध्ये नव्वदच्या दशकात आईच्या भूमिकेला ग्लॅमर प्राप्त करून देणाऱ्या अभिनेत्री म्हणजे रिमा. गेल्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्यामुळे त्या आपल्या मधून निघून गेल्या तरी त्यांच्या कलाकृती अजरामर आहेत. रिमा पुन्हा एकदा चाहत्यांच्या भेटीला येत आहेत ‘होम स्वीट होम’ या चित्रपटातून, त्यांची प्रमुख भूमिका असलेला ‘होम स्वीट होम’ हा मराठी चित्रपट येत्या २८ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होतो आहे. या चित्रपटाला बॉलीवूड सुपरस्टार सलमान खान याने मराठीतून शुभेच्छा देत रीमा यांच्या आठवणीना उजाळा दिला आहे.

रीमा यांच्याविषयी बोलताना सलमान खान म्हणाला, “ माझे पदार्पण असलेला आणि सुपरहिट ठरलेल्या ‘मैने प्यार किया’ या चित्रपटामुळे मला ओळख मिळाली. त्यात रीमा माझ्या आईच्या भूमिकेत होत्या. खासगी आयुष्यात मला २ आई असल्या तरी सिनेमात मात्र माझ्या आवडीच्या आई नेहमी रीमाच राहिल्या. अतिशय प्रेमळ, समंजस अशा रीमा ताईंची प्रमुख भुमिका असलेला होम स्वीट होम चित्रपट मी नक्कीच बघणार आहे.”

सलमान खानने रीमा यांच्या बद्दल बोलताना ‘हम आपके है कौन’, ‘हम साथ साथ है’ या चित्रपटासह अनेक जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे, तसेच आपल्या सर्व चाहत्यांना ‘होम स्वीट होम’ चित्रपट आवर्जून बघण्याचे आवाहनही केले आहे.

हृषीकेश जोशी दिग्दर्शनात पदार्पण करत असलेल्या या ‘होम स्वीट होम’ ची निर्मिती फ्रेम्स प्रॉडक्शन कंपनी प्रा. लि. यांची असून प्रोऍक्टिव्ह प्रस्तुतकर्ता आहेत. या चित्रपटात रीमा यांनी एका गृहिणीची भूमिका साकारली आहे. रिमा यांच्यासह मोहन जोशी, स्पृहा जोशी, हृषीकेश जोशी, विभावरी देशपांडे, प्रसाद ओक सुमीत राघवन, मृणाल कुलकर्णी, क्षिती जोग, दीप्ती लेले, अभिषेक देशमुख यांच्या प्रमुख भूमिका ‘होम स्वीट होम’ मध्ये आहेत.

सलमान खान याने खास मराठीतून दिलेल्या शुभेच्छांचा व्हिडीओ पाहण्यासाठी खालील लिंक क्लिक करा

https://www.facebook.com/hshthefilm/videos/546842942443029/

 

सलमानला इतर सर्व अवॉर्डपेक्षा या अवॉर्डचा जास्त अभिमान वाटतो.

सलमान- आसारामबापू जेलमध्ये असणार शेजारी

सलमान खान आणि शिल्पा शेट्टी यांच्यावर गुन्हा दाखल

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!