Share

सलमान- आसारामबापू जेलमध्ये असणार शेजारी

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा- दोन काळवीटांची शिकार करणारा बॉलिवूडचा ‘टायगर’ अभिनेता सलमान खान अखेर २० वर्षांनी जेरबंद झाला आहे. जोधपूर कोर्टाने सलमानला पाच वर्षांचा तुरुंगवास आणि १० हजार रुपये दंड ठोठावला असून त्याची रवानगी सेंट्रल जेलमध्ये केली जाणार आहे. या प्रकरणात सलमानला तीन वर्षांपेक्षा कमी शिक्षा झाली तर तत्काळ जामीन मिळण्याची शक्यता आहे, पण त्यापेक्षा जास्त शिक्षा झाली तर त्याची तुरूंगात रवानगी केली जाईल. कोर्टाने सलमानला शिक्षा सुनावली तर तुरुंगात तो आसाराम बापूसोबत राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

राजस्थान पत्रिकाच्या वृत्तानुसार, कोर्टाने सलमानला शिक्षा सुनावल्यास त्याची रवानगी सेंट्रल जेलच्या बराक क्रमांक दोनमध्ये होऊ शकते. विशेष म्हणजे याच बराकमध्ये लैंगिक शोषणाप्रकरणी तुरुंगवास भोगत असलेला आसाराम बापूही कैद आहे. यापूर्वी जेव्हा सलमानला तुरूंगवास झाला होता तेव्हा त्याला याच तुरुंगाच्या बराक क्रमांक एकमध्ये ठेवण्यात आलं होतं.दरम्यान, कोर्टाने ज्या अभिनेत्यांना निर्दोष ठरवलं आहे, त्याला विश्नोई समाज वरच्या कोर्टात आव्हान देणार आहे. जोधपूर कोर्टाने सैफ अली,तब्बू, नीलम आणि सोनाली बेंद्रे यांना निर्दोष ठरवलं आहे.

काळवीट शिकार प्रकरणात जोधपूरमधील न्यायालयाने गुरुवारी निकाल दिला. न्या. देवकुमार खत्री यांनी या प्रकरणी निकाल दिला. सकाळी सव्वा अकराच्या सुमारास न्या. खत्री न्यायालयात पोहोचले. त्यापूर्वी सलमान खान, नीलम, सोनाली बेंद्रे, सैफ अली खान, तब्बू हे सेलिब्रिटीही न्यायालयात पोहोचले होते. निकालाच्या पार्श्वभूमीवर न्यायालयाबाहेर सलमानच्या चाहत्यांनी गर्दी केली होती.

काय आहे प्रकरण ?

कांकाणी गावात दोन काळवीट शिकार केल्याचं हे प्रकरण आहे. सलमानने 1998 मध्ये एक आणि दोन ऑक्टोबरच्या रात्री विविध ठिकाणी काळवीटाची शिकार केल्याचा आरोप आहे.गोळीचा आवाज ऐकून ग्रामस्थ घटनास्थळी आले. तेव्हा सलमानने इतर कलाकारांसोबत गाडीतून पळ काढला, तर दोन्ही हरणांचे मृतदेह तिथेच पडून होते. याप्रकरणी सलमान दोषी ठरला आहे.दरम्यान, कोर्टानं शिक्षा सुनावण्याआधी जेव्हा सलमान आणि इतर आरोपींना आपलं म्हणणं मांडण्याची संधी दिली, तेव्हा सर्वांनीच आपल्यावरचे आरोप नाकारले होते.आपण काळविटाची शिकार केली नाही, त्यात आपला कुठलाही हात नाही, असं म्हटलं होतं.मात्र कोर्टानं त्यानंतर सलमान खानला दोषी ठरवत असल्याचं जाहीर केलं. तर इतर आरोपींना केवळ पुराव्याअभावी निर्दोष सोडलं.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!