Share

गौतम गंभीर यांना ‘त्या’ प्रकरणात दिल्ली पोलिसांकडून मिळाली क्लीन चिट

Published On: 

नवी दिल्ली : राज्य आणि देशात गेल्या काही आठवड्यापासून कोरोनाच्या संसर्गाने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. कोरोनाच्या या संकटात अनेक मान्यवर पुढे येत वेगवेगळ्या प्रकारे मदत करत आहे. कोरोनाच्या या लढ्यात भारताचा माजी क्रिकेटपटू आणि दिल्लीचा भाजप खासदार गौतम गंभीरनेही पुढे येत एका औषधाचे मोफत वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे.

मागील महिन्यात २५ एप्रिल रोजी गौतम गंभीरने एक ट्विट केले होते. त्या ट्विटमध्ये गंभीरने फॅबीप्लू हे औषध मोफत वाटण्याची घोषणा केली होती. तसेच हे औषध मिळवण्यासाठी ठिकाण आणि वेळही दिली होती. मात्र काही दिवसानंतर या ट्विटवर पोलिसांची नजर गेली. पोलिसांनी हे औषध गंभीरला कुठे मिळाली याची चौकशी सुरु केली होती. या मोफत औषध वाटपावरुन गंभीर विरोधकांच्या देखील रडारवर आला होता. काँग्रेसचे पवन खेरा आणि आम जनता पार्टीचे दुर्गेश पाठक यांनी गंभीरवर आरोप करत त्याने ती औषधे कुठुन आणली अशी चौकशी करण्याची मागणी केली होती.

मात्र, दिल्ली पोलिसांनी या प्रकरणी गौतम गंभीर यांना क्लीन चिट दिली असून, यासंदर्भातील अहवाल दिल्ली उच्च न्यायालयात सादर केला आहे. दिल्ली पोलिसांनी उच्च न्यायालयाला सादर केलेल्या रिपोर्टमध्ये म्हंटल आहे की, आतापर्यंत करण्यात आलेल्या तपासात औषधांचा काळाबाजार केल्याचा आरोप झालेले हे सर्वजण लोकांना औषधे, ऑक्सिजन, प्लाझ्मा आणि हॉस्पिटल बेड्सच्या स्वरुपात वैद्यकीय मदत मिळवून देत होते. यावेळी त्यांनी मदत केलेल्यांकडून एक रुपयाही घेतला नाही. यामुळे त्यांच्यावर होणारा घोटाळ्याचा आरोप चुकीचा आहे. वाटप किंवा मदत ही कोणताही भेदभाव न करता सुरु होती, असे पोलिसांनी सांगितले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!