Share

सलीम पटेल हा हसीना पारकरचा ड्रायव्हर होता- देवेंद्र फडणवीस

Published On: 

मुंबई : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली. अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात तुफान खडाजंगी सुरु आहे. फडणवीस आजच्या पत्रकार परिषदेत काय धमका करणार यांची सर्वांना उत्सुकता होती. फडणवीसांंनी मलिकांबाबत एक धक्कादायक आरोप केला आहे.

माय मराठीची क्षमा मागून आजच्या पत्रकार परिषदेची सुरुवात राष्ट्रभाषेत करणार आहोत. मी एक घोषणा केली होती दिवाळीनंतर काही गोष्टी समोर आणणार आहे. उशीर झाला, काही लोकांच्या पत्रकार परिषद सुरु होत्या. मी जे सांगणार आहे ती सलीम जावेद यांची कथा नाही. तो इंटरवल नंतरचा चित्रपट नाही. हा एक देशाच्या सुरक्षेबद्दलचा प्रश्न आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. ‘नवाब मलिकांच्या कुटुंबियांकडून अंडरवर्ल्डच्या लोकांकडून जमीन खरेदी करण्यात आली’, असा गंभीर आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

सरदार शहाबली खान हा 1993 चे गुन्हेगार आहेत. त्यांना जन्मठेप झाली आहे ते तुरुंगात आहेत. त्यांची शिक्षा सुप्रीम कोर्टानं कायम केली आहे. सरदार शहाबली खान याच्यावर टायगर मेमन याच्या नेतृत्त्वात मुंबई महापालिका आणि बॉम्बे स्टॉक एक्सेंजमध्ये बॉम्ब ठेवण्यासंदर्भात चर्चा झाली होती. टायगर मेमनच्या घरी बैठक झाली होती. टायगर मेमनच्या गाडीत आरडीएक्स भरलं गेलं त्यामध्ये सरदार शहाबली खानचा समावेश होता. सरकारी साक्षीदारांनतर त्यांना शिक्षा भोगावी लागत आहे, असं फडणवीस म्हणाले आहेत.

सलीम पटेल हे व्यक्ती आहेत. आर.आर.पाटील एका इफ्तार पार्टीत गेले होते. त्यामध्ये आर.आर. पाटील यांचा दोष नव्हता. सलीम पटेल याच्यासोबत फोटो चालवला गेला होता. सलीम पटेल हा हसीना पारकरचा ड्रायव्हर होता. 2007 मध्ये हसीना पारकरला अटक झाल्यानंतर सलीम पटेलला अटक करण्यात आली होती. दाऊद फरार झाल्यानंतर हसीना पारकरच्या नावावर संपत्ती जमा करण्यात येत होती. सलीम पटेलच्या नावावर पॉवर ऑफ अटर्नी करण्यात येत होती, असा दावा फडणवीस यांनी केला.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!