Share

राज्य सरकारविरोधात भाजपचं पुण्यात आंदोलन

Published On: 

🕒 1 min read

पुणे : वाढत्या महागाईला सामान्य जनता चांगलीच वैतागली आहे. देशात इंधन दरवाढीमुळे सामान्य नागरिक केंद्र सरकारवर चांगलाच संतापल्याचं पाहायला मिळालं. सोशल मीडियावरही केंद्र सरकारवर टीकेची झोड उठवली जात होती. नागरिकांचा संताप पाहता केंद्राकडून पेट्रोल डिझेलच्या दरामध्ये 5 रुपयांची कपात करण्यात आली. त्यानंतर महाराष्ट्रामध्ये राज्य सरकारने देखील पेट्रोल-डिझेलचे कर कमी करुन नागरिकांना दिलासा देण्यासाठी भाजपचे नेते राज्य सरकारच्या मागे लागले आहेत. त्याचबरोबर राज्यातील इतर प्रश्नांवरुन पुण्यात भाजपचं आंदोलन सुरु आहे.

राज्य सरकारने इंधनावरील VAT कमी करावा, एसटी कर्मचारी संप आणि आरोग्य विभागातील भरतीतील गोंधळाचा निषेध करण्यासाठी भाजपचे शहर अध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आलं. यावेळी बोलताना त्यांनी महाविकास आघाडीवर जोरदार ताशेरे ओढले आहेत. जगदीश मुळीक यांनी या सर्व प्रश्नांवरुन राज्य सरकारला लक्ष्य केलं आहे.

गेल्या दोन वर्षात महाविकास आघाडीची सत्ता असताना त्यांना वाटतं प्रत्येक काम केंद्राने करावं. राज्यातील कोणताही विषय असेल तर केंद्राच्या माथी मारण्याचा प्रयत्न करुन महाराष्ट्राच्या जनतेची दिशाभूल करण्याचं काम महाविकास आघाडी सरकार करत असल्याचा आरोप जगदीश मुळीक यांनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!