मुंबई : मुंबईतील साकीनाका येथील मन विषन्न करणाऱ्या घटनेमुळे अवघ्या महाराष्ट्राची मान शरमेने खाली झुकली आहे. साकीनाका येथील पीडित महिलेवर बलात्कार करुन तिच्या गुप्तांगात लोखंडी सळई घालण्याचा प्रकार घडला. या अत्याचारानंतर महिलेला अमानुषपणे मारहाण देखील करण्यात आली होती. दुर्दैवाने आता या महिलेचा मृत्यू झाला असून या भयंकर घटनेमुळे सर्वच क्षेत्रातून संताप व्यक्त केला जात आहे.
राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी देखील पीडितेला श्रद्धांजली वाहताना आरोपींना कठोर शिक्षा केली जाईल असा शब्द दिला आहे. ‘साकिनाका येथील पिडीतेचा मृत्यू अत्यंत वेदनादायी आहे. ईश्वर तिच्या आत्म्यास शांती देवो. महिला अत्याचाराच्या घटनांबाबत सरकार संवेदनशील आहे. एकाही आरोपीला आम्ही सोडणार नाही,’ अशी गर्जना ठाकूर यांनी केली आहे.
पुढे, ‘राज्याचे मुख्यमंत्री, गृहमंत्री आणि संपूर्ण शासन, तसंच महिला आयोगाने या प्रकरणात पहिल्यापासून संवेदनशीलतेने लक्ष घालून काम करतंय. आरोपींना मोकळं सोडणार नाही, हीच तिला खरी श्रद्धांजली ठरेल,’ अशी भावना देखील यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केली आहे.
राज्याचे मुख्यमंत्री, गृहमंत्री आणि संपूर्ण शासन, तसंच महिला आयोगाने या प्रकरणात पहिल्यापासून संवेदनशीलतेने लक्ष घालून काम करतंय. आरोपींना मोकळं सोडणार नाही, हीच तिला खरी श्रद्धांजली ठरेल.
— Adv. Yashomati Thakur (@AdvYashomatiINC) September 11, 2021
नराधमाची गय नाही ! साकीनाका बलात्कार प्रकरणी ‘फास्ट ट्रॅक’
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अशा प्रकरणांना वेळीच आळा घालण्यासाठी व आरोपीला कडक शिक्षा व्हावी यासाठी महत्वाचा निर्णय घेतला आहे. ‘साकीनाका परिसरात महिलेवर बलात्कार होऊन नंतर तिचा मृत्यू होणं हे माणुसकीला काळिमा फासणारे कृत्य असून गुन्हेगारास कठोर शिक्षा केली जाईल. यासंदर्भात मी राज्याच्या गृहमंत्र्यांशी देखील बोललो आहे. खटला फास्ट ट्रॅकवर चालवला जाईल,’ असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- आम्ही तुरुंगात असतांना कार्यकर्त्यांना दुःख होतं, त्यांना खाली पाहावं लागलं, याचं दुःख होतं – भुजबळ
- मोठी बातमी! गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा
- आरोपीच्या शिक्षेसाठी गृहमंत्री आणि मुख्यमंत्री लवकरात लवकर पाऊल उचलतील याचा विश्वास – राऊत
- उजळ माथ्याने मेळावे घेणाऱ्या महेबूब शेखवरही गुन्हा दाखल करा, भाजप महिला मोर्चाची मागणी
- ‘कॅंण्डल मार्चवाले आता आवाज का उठवत नाही?’; ‘साकीनाका घटनेवर वेलणकरचा संतप्त सवाल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

