🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा- स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून लढत असून मतमोजणीत सुरुवातीपासून पिछाडीवर आहेत. पराभवाच्या छायेत असलेल्या राजू शेट्टी यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. दरम्यान राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी हातकणगले मतदार संघातील विजय हा काळ्या आईला अर्पण केल्याचं जाहीर केलं आहे.या मतदार संघातून सेनेचे धैर्यशील माने विजयी झाले आहेत.
आम्हाला मुख्यमंत्र्यांनी या मतदारसंघातून विजय मिळविण्याची जबाबदारी दिली होती. ती आम्ही यशस्वीपणे पार पाडली. हा विजय अतिशय महत्वपूर्ण असून आम्ही शेतकरी चळवळीचा झेंडा खाली पडू देणार नाही असं देखील त्यांनी म्हटले आहे.
दरम्यान, मतमोजणीची सुरुवातीचे कल पाहता स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि काँग्रेस – राष्ट्रवादी यांची आघाडी जनतेला पसंत पडलेली नाही, अशी प्रतिक्रिया स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दिली.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
