Share

…अन् सदाभाऊंसमोर बळीराजाला रडू कोसळले

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : देशातून परतीच्या मार्गावर असलेल्या मान्सूनने अखेरच्या टप्प्यात राज्यभर जोरदार हजेरी लावली. पश्चिम महाराष्ट्र, कोकण, मराठवाड्यात मुसळधार पावसाने धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करण्यासाठी सदाभाऊ खोत यांच्या नाशिक दौऱ्याला सुरवात झाली आहे.

नाशिकयेथे नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी गेलेल्या कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यासमोर शेतकऱ्यांना रडू कोसळले. परतीच्या पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं आहे. सरकारने त्वरीत मदत करावी, अशी मागणी यावेळी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केली.

यावेळी सदाभाऊंसमोर बळीराजाला अश्रू अनावर झाले. घाम गाळून कमावलेलं पिक पावसामुळे मातीमोल झाल्यानं शेतकरी रडले. आता माय बाप सरकारने मदत करावी, अशी मागणी यावेळी शेतकऱ्यांनी केली.

दरम्यान, शेतकर्यांचे झालेले नुकसान पाहता सदाभाऊ खोत यांनी शेतकर्यांना आश्वासन दिले. ते म्हणाले, ‘येत्या आठ दिवसांत पंचनामा पूर्ण करून मदत दिली जाईल, असं आश्वासन सदाभाऊ खोत यांनी शेतकऱ्यांना दिलं. तसंच पंचनामा करण्यास दिरंगाई झाली तर संबंधित अधिकाऱ्यांवरही कारवाई करण्यात येईल’, असे खोत म्हणाले.

महत्वाच्या बातम्या 

https://twitter.com/Maha_Desha/status/1190160099211268097?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1190169491864375296?s=20

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!