Share

पारावर गावगप्पा करणाऱ्यांच्या वक्तव्य ला काय अर्थ आहे-खोत

Published On: 

🕒 1 min read

अकोला : तुपकर हे नेहमीच चर्चेत राहण्यासाठी भडक वक्तव्य करतात. त्यांची राजकीय उंची मोठी नसल्याची टीका कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी अकोल्यात केली आहे.भीमा-कोरेगाव प्रकरणामागे भाजपचा हात असल्याचा आरोप स्वाभिमानीचे नेते रविकांत तुपकर यांनी केला होता .पारावर गावगप्पा करणाऱ्यांच्या वक्तव्य ला काय अर्थ आहे अशा शेलक्या शब्दात मुख्यमंत्र्यांचा बचाव करताना खोत यांनी तुपकरांवर टीका केली.

‘शेतकरी समस्या निवारण मेळाव्या’कडे शेतकऱ्यांनी फिरवलेल्या पाठीमुळे मूर्तीजापूर तालुक्यातील कानडी येथे झालेला कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचा मेळावा पुरता फसल्याच चित्र पहायला मिळालं.सदाभाऊंच्या रयत संघटनेच्या वतीने मूर्तीजापूर तालुक्यातील कानडी येथे हा मेळावा आयोजित करण्यात आला होता. मात्र, या मेळाव्याकडे शेतकऱ्यांनीच पाठ फिरवल्याने सदाभाऊंची मोठी अडचण झाली.

sadabhau khot

सभेनंतर पत्रकारांशी बोलतांना त्यांनी भीमा-कोरेगाव प्रकरणामागे भाजपचा हात असल्याचा आरोप करणाऱ्या स्वाभिमानीचे नेते रविकांत तुपकरांवर बोचरी टीका केली. पारावर गावगप्पा करणाऱ्यांच्या वक्तव्य ला काय अर्थ आहे, अशा खोचक शब्दात खोत यांनी तुपकरांवर टीका केली.दरम्यान, विरोधकांच्या हातात कोणताही मुद्दा नसल्यामुळे ते उठसूठ सरकारवर टीका करत असल्याचं सदाभाऊ म्हणाले.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!