मुंबई: राज्यावर कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची दाट शक्यता असतानाच आता राज्य सरकारकडून महत्वाची पाऊले उचलली जात आहे. दरम्यान राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी नवीन नियम लागू केले असल्याची माहिती दिली आहे. विनाकारण रस्त्यावर फिरताना दिसलं तर त्याला थेट ५०० रुपयांचा दंड आकारला जाणार आहे. याशिवाय कुणी मास्क नसताना थुंकताना दिसला तर त्या व्यक्तीकडून १००० रुपये दंड घेतला जाणार आहे. असे नियम आता करण्यात आले आहेत. मात्र यावरूनच माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी मात्र राज्य सरकारवर टीका केली आहे.
हे म्हणजे असं झालंय, ‘नेमेचि येतो कोरोना, जाचक नियमाखाली कुणी का मरेना!’ कोरोना संदर्भात अटी व नियम हे सर्वसामान्य जनतेला परवडणारे असावेत. पण चुकीचे निर्णय घेण्यासाठी हे सरकार कटिबद्ध आहे. कधीतरी जनतेवर भार टाकण्याआधी संवेदशीलतेने विचार करा. अशा शब्दांत ट्वीट करत सदाभाऊ खोत यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे.
हे म्हणजे असं झालंय,
नेमेचि येतो कोरोना,
जाचक नियमाखाली कुणी का मरेना!कोरोना संदर्भात अटी व नियम हे सर्वसामान्य जनतेला परवडणारे असावेत. पण चुकीचे निर्णय घेण्यासाठी हे सरकार कटिबद्ध आहे. कधीतरी जनतेवर भार टाकण्याआधी संवेदशीलतेने विचार करा. pic.twitter.com/ly8a7PA0cg
— Sadabhau Khot (@Sadabhau_khot) January 6, 2022
दरम्यान वीकेण्ड लॉकडाउन, नाईट कर्फ्यू या सगळ्या संदर्भात चर्चा झालेल्या आहेत परंतु, अद्याप निर्णय कुठेलेही झालेले नाहीत. याबाबत मुख्यमंत्री निर्णय घेतात.तसेच, मुंबई लोकल ट्रेन बंद करण्याचा कुठला विषय सध्या नाही. जिल्हांतर्गत बंदी देखील तूर्त कुठलीही नाही. असेदेखील राजेश टोपे यांनी म्हटले आहे. आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यात बैठक झाली. या बैठकीत कोरोना संसर्गाच्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर चर्चा झाली. तसेच शरद पवार यांनी राज्यातील एकंदरीत परिस्थितीचा आरोग्यमंत्र्यांकडून आढावा घेतला.
महत्वाच्या बातम्या –
- मोदींची सभा रद्द होण्यामागे सुरक्षेत चूक की सभेतील मोकळ्या खुर्च्या?; राष्ट्रवादीचा सवाल
- राजकीय लोकांना कोरोना होत नाही का?, नियम फक्त सामान्यांनाच का?
- कोरोना रुग्णसंख्या वाढल्यानंतर शरद पवार मैदानात, आज महत्वाची बैठक
- राज्य सरकारचा मोठा निर्णय; आता पोलीसही करू शकणार वर्क फ्रॉम होम
- पंतप्रधानांच्या सुरक्षेत गंभीर चूक; नवाब मलिकांची प्रतिक्रिया

