मुंबई : पंजाबच्या नागरिकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या फिरोजपूर येथील सभेला गैरहजेरी लावून मोदींच्या भूमिकेला विरोध केला आहे. शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु असल्यामुळे सुरक्षेचे कारण पुढे करत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सभेला न जाता माघारी फिरण्याचा निर्णय घेतला. मात्र सभेच्या ठिकाणी कुणीही उपस्थित नसल्यामुळे पंतप्रधानांनी सभेला जाण्याचे टाळले, असा आरोप किसान एकता मोर्चाने केला आहे. किसान एकता मोर्चाने सभेच्या ठिकाणी असलेल्या मोकळ्या खुर्च्यांचे फोटोही सोशल मीडियावर टाकले आहेत.
दरम्यान, याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसनेही आपल्या अधिकृत फेसबूक अकाऊंटवर यावर प्रश्न उपस्थित केला आहे. पंतप्रधानांची फिरोजपूर सभा रद्द होण्यामागचे खरे कारण हे सुरक्षेत चूक की सभेतील मोकळ्या खुर्च्या, हाच खरा प्रश्न असल्याचे राष्ट्रवादीने म्हटले आहे.
कृषी कायद्यांना विरोध करण्यासाठी उत्तर भारतातील शेतकरी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत असताना वर्षभरात जवळपास ७०० शेतकऱ्यांना आपला जीव गमवावा लागला होता. या शेतकऱ्यांच्या बलिदानाप्रती देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणतीही सहानुभूती व्यक्त केली नाही. वा त्यांच्याप्रती एखादे ट्विट देखील केले नाही. उलट राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी जेव्हा शेतकरी आंदोलनाला गंभीरतेने घ्यायला सांगितले, तेव्हा ते ५०० शेतकरी माझ्यासाठी मेले का? असे असंवेदनशील उत्तर पंतप्रधान मोदींनी त्यावेळी दिल्याचे खुद्द मलिक यांनी सांगितले होते.
तसेच भाजपने मोदींच्या रैलीमध्ये 5 लाख लोक जमणार असल्याचा दावा केला होता. मात्र प्रत्यक्षात फक्त ५ हजार लोक जमले असल्याची माहिती समोर आली आहे. कॉंग्रेसचे डीजीटल मिडियाचे को-कॉरडीनेटर सौरभ राय यांनी या सभेतील फोटो ट्वीटरवर पोस्ट केले आहेत. त्या फोटोतून हा दावा फोल ठरला असल्याचे स्पष्ट होते.
पंतप्रधान मोदी का पोहचू शकले नाही?
पंतप्रधान मोदी यांची फिरोजपूर येथे सभा सुरक्षा यंत्रणेतील त्रुटींमुळे ऐनवेळी रद्द करण्यात आली. कार्यक्रमस्थळी जाणाऱ्या पंतप्रधानांचा ताफा एका फ्लायओव्हरवर आंदोलकांमुळे सुमारे १५ ते २० मिनिटे अडकून पडला.जिथे हा ताफा अडकला तिथून पाकिस्तान फक्त १० किमी अंतरावर होतं. हा मोदींच्या हत्येचा कट होता,असा आरोपही भाजपने केला आहे. यावरूनच आता केंद्रातील सत्ताधारी भाजप आणि पंजाबमधील काँग्रेस यांच्यात वाद निर्माण झाला आहे.
महत्वाच्या बातम्या –
- राज्य सरकारचा मोठा निर्णय; आता पोलीसही करू शकणार वर्क फ्रॉम होम
- चिंताजनक! मुंबईत मागील २४ तासांत ७१ पोलिसांना कोरोनाची लागण
- ‘सध्या सिनेमागृह किंवा मॉल्स बंद करण्याची गरज नाही, पण ..’,मंत्री अमित देशमुखांची माहिती
- अभिनेता राजकुमार रावच्या नावाने बनावट ईमेल आयडी बनवून मागितले ‘इतके’ कोटी ; पोस्ट झाली व्हायरल
- मोदींच्या सुरक्षेतील त्रुटीचा मुद्दा हायकोर्टात; उद्या होणार सुनावणी

