Share

राजकीय लोकांना कोरोना होत नाही का?, नियम फक्त सामान्यांनाच का?

Published On: 

देशभरात कोरोनाचे रुग्ण पुन्हा एकदा मोठ्या संख्येने वाढत आहेत. सामान्य नागरिकांना आता पुन्हा एकदा लॉकडाऊनची भीती सतावत आहे. आत्ता कुठे व्यवहार सुरळीत होत होते मात्र आता तिसऱ्या लाटेची शक्यत तज्ञांकडून वर्तवण्यात येत आहे. एकीकडे सामान्य नागरिक या कोरोनामुळे हैरान झाले आहेत. मुलांच्या शाळा पुन्हा बंद करण्यात आल्या आहेत. हे सगळं चित्र एकीकडे. दुसरीकडे मात्र राजकीय नेते निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जाहीर सभा घेत फिरत आहेत. मग प्रश्न असा उपस्थित होतो की हे कोरोनाचे निर्बंध केवळ सामान्य नागरिकांनाच लागू आहेत का? की सामान्य नागरिकांनाच कोरोना होतो आणि राजकीय नेत्यांना कोरोना होत नाही, असं काही आहे ?

राजकीय नेत्यांना कोरोना होत नाही का, हा जो प्रश्न उपस्थित केला आहे त्याला कारण म्हणजे इतक्या बिनधास्तपणे हे नेते मंडळी जाहीर सभा घेतायत, रॅली काढतायत. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः कोरोनाचे नियम पाळण्याचे आवाहन करतात मात्र त्यांच्या सभांना होणाऱ्या महागर्दीत कोरोनाचे नियम पायदळी तुडवले जातात. यावरून हे दिसतं की यांना कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची चिंता नाही तर निवडणुकीची लाट जास्त महत्वाची वाटत आहे, असं म्हणलं तर त्यात नवल नाही.

पुण्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक घेण्यात आली होती. त्या बैठकीनंतर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी सांगितलं की तोंडाला मास्क नसेल तर नागरिकांकडून ५०० रुपये दंड तसेच रस्त्यावर थुंकल्यास हजार रुपये दंड ठोठावण्यात येणार आहे. हे नियम तुमच्या आमच्या सारख्या सामान्य नागरिकांनाच लागू का आहेत, असा प्रश्न पडणं साहजिक आहे. हा प्रश्न या साठी पडला कारण आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं आहे की तब्बल ७० आमदारांना कोरोनाची लागण झाली आहे तसेच दहा ते पंधरा मंत्र्यांना देखील कोरोना झाला असल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे. तरी सुद्धा हे विनामास्क फिरताना दिसतात.

सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांचा एक फोटो सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. त्यात त्यांनी कार्यकर्त्यांसोबत सेल्फी घेतला आहे. मात्र यात कोणाच्याही तोंडाला मास्क नाही तसेच सामाजिक अंतर तर कोणीच राखलेले दिसत नाही. शिवसेना खासदार संजय राऊत यांना मास्क का वापरत नाही असं मागे एकदा विचारलं असता त्यांनी उत्तर दिलं होतं की मी पंतप्रधान नरेंद्र मोदींना फॉलो करतो! एका खसदाराकडून अशा प्रकारचं वक्तव्यं आलं तर सामान्य नागरिकांनी काय म्हणायचं? हे निर्बंध आणि हे नियम सामान्य नागरिकांनाच का? कोरोना होऊ नये म्हणून हे नियम नक्कीच सर्वांनी पाळले पाहिजेत त्यात काही वाद नाही, पण मग जे राजकीय नेते मास्क वापरत नाहीत त्यांच्यावर सुद्धा तुम्ही कारवाई करणार का? हा सरळ साधा प्रश्न सर्वांनाच पडला आहे.

सत्ता आणि राजकारण यात गुरफटला जातो तो सामान्य माणूस. यांच्या सभा, मोर्चे, आंदोलन, रॅली सगळं काही निवांत चालू असतं आणि प्रत्येक नेता आपापली राजकीय पोळी भाजून घेण्याची एकही संधी सोडत नाहीत हेही तेवढंच खरं. आणि खरंच कोरोनाची एखादी लाट येऊन गेली तरी यांना कळणार नाही कारण यांना महत्वाची लाट म्हणजे राजकारणाची, निवडणुकांची…

महत्वाच्या बातम्या:

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!