सांगली : दुधाला किमान ३० रुपये दर मिळावा, या प्रमुख मागणीसाठी राज्यात किसान सभा व दुध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीने राज्यभरात ठिकठिकाणी दूधआंदोलनाला सुरुवात केली आहे. अकोले, अहमदनगर येथून दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्या आंदोलनाला सुरुवात झाली आहे. दुधाला 30 रुपये भाव द्या, या मागणीसाठी शेतकरी रस्त्यावर उतरले आहे. नगरमध्ये दगडाला दुधाचा अभिषेक घालून पाषाण हृदयी केंद्र आणि राज्य सरकारचा निषेध करत शेतकऱ्यांनी आंदोलनाला सुरुवात केली आहे.
दुधाला प्रति लीटर 30 रुपये दर द्या, केंद्र सरकारने घेतलेला दूध पावडर आयातीचा निर्णय तत्काळ मागे घ्या, दुधाला रास्त भाव मिळावा यासाठी सरळ शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रति लिटर 10 रुपये अनुदान वर्ग करा, या प्रमुख मागण्यांसाठी राज्यभर अशा प्रकारे आंदोलन करण्यात येणार आहे. ‘भिक नको घामाचे दाम द्या’ अस म्हणत शेतकरी आंदोलन करत आहेत.
शरद पवार यांचे हे वक्तव्य रामद्रोही, उमा भारतींचा जोरदार टोला
यातच आता राजू शेट्टी यांचं आंदोलन म्हणजे मॅच फिक्सिंगप्रमाणे दूध फिक्सिंगचं आंदोलन असल्याची टीका सदाभाऊ खोत यांनी केली आहे. सरकारने त्यांना चर्चेसाठी ज्या दिवशी बोलावलं त्याच दिवशी ते आंदोलन करत आहेत, त्यांची ही भूमिका दुटप्पी आहे. तसंच आमदारकी मागायला तुम्ही बारामतीला गेलात मात्र बैठकीसाठी न जाता आंदोलन करतात, ही भूमिका शंकास्पद असल्याचं म्हणत सदाभाऊ खोत यांनी राजू शेट्टी यांच्यावर टीका केली आहे.
सांगलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोना संदर्भात बोलावलेल्या बैठकीला विधान परिषदेच्या आमदारांना निमंत्रण देण्यात आलेलं नाही. आम्ही फॉरेनहून आलो आहोत काय? असा सवाल करत, जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही परदेशी वाटलो असल्यानेच त्यांनी बैठकीला बोलावलं नाही, आम्ही आमदार आहोत, आम्हालाही बैठकीला बोलावलं पाहिजे होतं, असं म्हणत सदाभाऊ खोत यांनी निशाणा साधला आहे.
कोरोनाच्या अपयशावरुन जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी भूमिपूजनाचा घाट – थोरात
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

