Share

‘राजू शेट्टी भंपक माणूस आहे,गावात जसा सोडलेला वळू असतो तसा हा वळू आहे’

Published On: 

सांगली-दुध उत्पादकांच्या विविध मागण्यांसाठी आज राज्यभर गावोगावी चावड्यांसमोर दुधाचा अभिषेक घालत दूध उत्पादकांचे तीव्र आंदोलन सुरु झाले आहे. किसान सभा व दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीसह महायुतीने आंदोलनात उडी घेतली आहे.

दरम्यान, आता माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांच्यावर जोरदार टीका केली. ‘राजू शेट्टी भंपक माणूस आहे. ते भ्रमिष्ठ झालेत. गावात जसा सोडलेला वळू असतो तसा राजू शेट्टी हा वळू रेडा आहे. जसा वळू जिथं तिथं तोंड घालतो, तसं राजू शेट्टी जिथं तिथं तोंड घालत आहे’, अशी घणाघाती टीका सदाभाऊ खोत यांनी केली.

खोत,म्हणाले, राजू शेट्टी यांची मस्ती हातकणंगले मतदारसंघातील लोकांनी उतरवली आहे. राजू शेट्टी हे पाय चाटण्यासाठी बारामतीला गेले, जिथं जाईल तिथं पाठीत खंजीर घुपसायचा असा त्यांचा उद्योग आहे.राजू शेट्टी यांच्या शाळेचा मी मुख्याध्यापक होतो, त्यामुळे त्यांचे सर्व कारनामे मला माहिती आहेत. यांच्यासारखं 300 एकर जमीन कुठं घेऊन ठेवल्या नाही, पेट्रोल पंप कार्यकर्त्यांच्या नावावर घेऊन ठेवल्या नाहीत, असा आरोप खोत यांनी केला.

दरम्यान, राजू शेट्टी यांनी आंदोलन करणाऱ्या भाजप नेत्यांवर निशाणा साधला आहे. भाजपला दुधाचं आंदोलन करण्याचा अधिकार नाही, भाजप काळात दूध उत्पादक शेतकरी अडचणीत आला होता. केवळ राज्य सरकारविरोधात आंदोलन असेल तर ही शुद्ध दूध उत्पादक शेतकऱ्यांची फसवणूक आहे, अशी टीका राजू शेट्टी यांनी केली.

‘भाजपचे आजचे आंदोलन हे पुतणा मावशीचे प्रेम आहे. कारण, ठोस उपाय योजना करण्याचे काम हे केंद्र सरकारचे आहे. केंद्राने आयात थांबवली पाहिजे, निर्यातीला सबसिडी दिली पाहिजे आणि जीएसटी मागे घेतला तर दूध उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल’ असं म्हणत राजू शेट्टींनी भाजपवर निशाणा साधला आहे.

महत्वाच्या बातम्या नक्की वाचा –

‘राज्य सरकारने दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या संयमाचा अंत पाहू नये’

अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न मिळायलाच हवा… जयंत पाटील यांची मुख्यमंत्र्याकडे मागणी

सचिन सावंत यांनी ट्विटरवर केलेल्या आरोपांचे मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी केले खंडन

असे जुळले होते शरद पवारांचे लग्न, जाणून घ्या शरदबाबू आणि प्रतिभाताईंच्या लग्नाची गोष्ट

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!