नाशिक : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांचा राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्याकडे अभ्यास सुरू आहे, त्यांचा अभ्यास झाल्यावर काय होते ते पाहू. असा टोला माजी मंत्री आणि शेतकरी नेते सदाभाऊ खोत यांनी राजू शेट्टी यांना लगावला आहे. तर राजू शेट्टींचे प्रश्न राज्य स्तरावरील आणि आंदोलन राष्ट्रीय स्तरावरील असते. ते १४० संघटनांशी संलग्न आहेत. त्यामुळे छोट्या संघटनांची त्यांना आवश्यकता नाही, असा टोमणा देखील सदाभाऊ खोत यांनी मारला आहे.
मुख्यमंत्र्यांशी दोनदा प्रयत्न करूनही संपर्क न झाल्याने आता पत्रव्यवहार करीत आहे. शेतकऱ्यांसाठी पीककर्जाचा विषय अतिशय महत्वाचा आहे. त्यामुळे राज्यातील त्या त्या जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांनी जिल्हाधिकारी आणि बॅंक अधिकाऱ्यांच्या बैठकी घेऊन खरीप पीककर्जाचा विषय पुढे न्यावा. शिखर बॅंकेने सरकारची आणि रिझर्व्ह बॅंकेची मान्यता घेऊन शेतकऱ्यांना थेट पीककर्ज पुरवठा सुरू करावा, असेही खोत म्हणाले.
बॉलिवूडचा सुलतान धावला मुंबई पोलिसांच्या मदतीला, मुख्यमंत्र्यांनी मानले आभार
शेतकरी, कष्टकऱ्यांच्या झालेल्या हालाबद्दलची भूमिका स्पष्ट करण्यासाठी खोत यांनी झूमद्वारे राज्यातील पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, ”खरिपासाठी शेतकऱ्यांना पीककर्ज न देणाऱ्या बॅंकांविरुद्ध राज्य सरकारने गुन्हे दाखल करावेत, बियाण्यासाठी 50 टक्के अनुदान द्यावे, अशी मागणी माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केली. तसेच केंद्र सरकारच्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवरील पॅकेजमध्ये काही नसल्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वपक्षीय बैठक घ्यावी, असे आव्हानही त्यांनी सरकारला दिले आहे. कोरोना संसर्गात कृषी आणि पणन विभाग अस्तित्वहीन राहिला, असा आरोप त्यांनी केला.
दरम्यान, फळबागा, भाजीपाल्याचे नुकसान झाले आहे. त्यांचे पंचनामे करून सरकारने कोरोनाच्या परिस्थितीत शेतकऱ्यांना मदत करावी. त्याचप्रमाणे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांकडे पाहून राजकीय टीकाटिप्पणी थांबवून दुधाला पाच रुपये लिटर, कांद्याला क्विंटलला पाचशे, कापसाला क्विंटलला दोन हजार, कडधान्याला एक हजार रुपयांचे अनुदान सरकारने द्यावे,” अशी मागणी सदाभाऊ खोत यांनी यावेळी केली.
मोदींच्या पॅकेजने अर्थव्यवस्था रूळावर येणार नाही, उलट असंतोष माजेल – पृथ्वीराज चव्हाण
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
