Share

मोदींच्या पॅकेजने अर्थव्यवस्था रूळावर येणार नाही, उलट असंतोष माजेल – पृथ्वीराज चव्हाण

Published On: 

औरंगाबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदी व अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी घोषित केलेल्या पॅकेजने घोर निराशा केली आहे. २० लाख कोटींच्या पॅकेजपैकी फक्त दोन लाख कोटी थेट मिळाले आहे. हे पॅकेज गोलमोल करून सांगितले आहे. उद्योग संघटनामध्ये भीती असल्याने या पॅकेजचे विश्लेषण त्यांनी केले नाही. या पॅकेजने आपली अर्थव्यवस्था रूळावर येणार नाही, उलट असंतोष माजेल असा घणाघात कॉंग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. सोमवारी त्यांनी झूम अँप द्वारे औरंगाबादेतील पत्रकारांशी संवाद साधला.

लॉकडाऊनचा निर्णय केंद्र सरकारने घेतलेला आहे. लॉकडाऊनमुळे जीवनचक्र थांबले आहे. हातात पैसे नाहीत, रोजगार नाही, हजारो लोकांच्या नोकऱ्या गेल्या, रोजगाराची शाश्वती नसल्याने शिल्लक पैसे जपून वापरण्यावर भर दिला जात आहे. त्यामुळे लोकांची क्रयशक्ती वाढवण्यासाठी पावले उचलली पाहिजेत. अमेरिका, जर्मनी, इंग्लंड यासह जगातील अनेक देशांनी सरकारी तिजोरीतून थेट लोकांच्या खात्यात पैसे जमा केलेत. भारताने असा कुठलाही निर्णय घेतला नाही. हे केले नाही तर पॅकेजला अर्थ नाही. कारखाने सुरू केले तरी सप्लाय चेन उभी करणे, हे मोठे आव्हान आहे. अस चव्हाण म्हणाले आहेत.

‘अक्षय बोऱ्हाडेने शिवप्रेमी आणि सर्वसामान्य लोकांना शिवछत्रपतींचे नाव वापरून फसवले’

तसेच त्यांनी, केंद्राने राज्याची थकबाकी त्वरित द्यावी, दुष्काळ, अतिवृष्टी अशा नैसर्गिक आपत्तीत केंद्राची मदत मिळते, कोविड-१९ साठी मात्र मदत आली नसल्याचे म्हटले आहे. त्याचबरोबर राज्य सरकारच्या कर्ज काढण्यासाठी मर्यादा पडतात, केंद्राची क्षमता मोठी असते, केंद्र सरकारकडे आरबीआयकडून पैसा घेणे, नोटा छपाई करणे, गोल्ड बॉण्ड काढणे, असे अनेक पर्याय आहेत. त्यामुळेच मी धार्मिक संस्थाकडील सोने गहाण ठेवून निधी उभा करण्याचा सल्ला मोदींना दिला होता, मात्र त्याचा चुकीचा अर्थ काढला गेला, असेही चव्हाण म्हणाले.

#corona : कृषी उत्पन्न बाजार समित्यांवर झालेला परिणाम आणि करावयाच्या उपाययोजनांसाठी समिती गठीत

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!