मुंबई : अभिनेता सोनू सूद कोरोना संकटाच्या काळात मजुरांच्या मदतीसाठी धावून आला आहे. सोनू सूद बरोबरच बॉलिवूड मधील अनेक कलाकार सरकारच्या आणि कोविड योद्ध्यांच्या मदतीला धावून आले आहेत. यामध्ये दबंग भाईजान सलमान खान देखील मागे नाही.
सलमानने पडद्यामागे काम करणाऱ्यांना मदत देऊ केली आहे. आत पुन्हा त्याने आपले मोठे मन दाखवले आहे. बॉलिवूडचा सुलतान मुंबई पोलिसांच्या मदतीसाठी धावून आला. त्यामुळे त्याच्या मदतीची कृतज्ञता व्यक्त करत मुख्यमंत्र्यांनी सलमानचे मानले आभार आहेत. मुंबई पोलिसांना एक लाख हॅण्ड सॅनिटायझरचं वाटप सलमानकडून करण्यात आलं. त्याच्या या कामाचं कौतुक करत महाराष्ट्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्याचे आभार मानले आहेत. महाराष्ट्र सीएमओ या ट्विटर अकाऊंटवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सलमान खानचे आभार मानले. ठाकरे यांनी एक ट्विटमध्ये म्हटले आहे की, आभार, सलमान खान. आमच्या मुंबई पोलिसांना एक लाख सॅनिटायझर दिल्याबद्दल तुझे धन्यवाद.
Thank you @BeingSalmanKhan for providing 1Lakh Hand Sanitizers to our @MumbaiPolice #WarAgainstVirus https://t.co/4qF5uU4IBv
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) May 30, 2020
उद्धव ठाकरेंच्या ट्विटला प्रतिक्रिया देत सलमाननेदेखील त्यांना धन्यवाद दिले. या ट्विट्सनंतर सलमानचे सर्वत्र कौतुक होत आहे. त्याच्यावर कॉमेंट्सचा पाऊस पडत आहे. शिवाय, लॉकडाऊनच्या काळात पनवेलच्या फॉर्म हाऊसवर असताना तेथूनही सलमानने आवश्यक असणाऱ्या वस्तू बैलगाड्या आणि ट्रॅक्टरमधून वाटप करण्यासाठी पाठवले होते.
Thank u ???? @CMOMaharashtra @Iamrahulkanal @MumbaiPolice #IndiaFightsCorona https://t.co/GtBL3UrTWC
— Salman Khan (@BeingSalmanKhan) May 30, 2020


