सावरगाव – शेतकऱ्यांच्या विविध समस्यांवरून रयत क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला आहे. सक्तीने वीज तोडली जात आहे, कोरोना महामारीच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये खाजगी दवाखाने सामान्य लोकांची लूट केली ,यावर सरकारचे नियंत्रण नाही अशा अनेक समस्यांनी ग्रस्त असणारे राज्य असताना, मुख्यमंत्री मातोश्रीच्या बाहेर यायला तयार नाहीत अशाप्रकारे कारभार चालू आहे. भविष्यकाळामध्ये असंघटित लोकांनी संघटीत होऊन आपल्या प्रश्नावर एकत्र येऊन या सरकारच्या विरोधात तीव्र लढा उभा कराव लागेल. रयत क्रांती संघटना यासाठी पुढाकार घेईल, मी सदाभाऊ खोत छातीचा कोट करुन सरकारच्या विरोधात उभा राहिलअसे प्रतिपादन सदाभाऊ खोत यांनी सावरगाव येथील आयोजित शेतकरी संवाद मेळाव्यात केले.
खोत म्हणाले, कोल्हापूरच्या भागामध्ये उसाला एफआरपी नुसार तीन हजार रुपयांच्या वर भाव मिळतो, पण या नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना २२०० ते २३०० रुपये मिळतात ही फार मोठी शोकांतिका आहे. इथल्या धनदांडग्या कारखानदारांच्या विरोधात आता आपल्याला एकत्र येऊन लढाई करावी लागणार आहे. ज्यांच्या विरोधात आपल्याला लढाई करायचे आहे ते प्रस्थापित लोक आहेत त्यामुळे आता आपण सगळे विस्थापित एकत्र येऊन हा शेतकरी चळवळीचा लढा आपल्या हक्कासाठी लढा लागेल.
जिल्ह्यामध्ये गेल्या वर्षी मोठ्या प्रमाणात अतिवृष्टीमुळे नुकसान होऊन सुद्धा शेतकऱ्याला पिक विमा मिळाला नाही. विमा कंपनी सरकारी अधिकारी आणि मंत्री यांचं साटंलोटं असल्याकारणाने शेतकऱ्याचा हक्काचा विमा मिळू शकला नाही. यावर्षी मोठ्या प्रमाणामध्ये पावसाचा खंड पडला, पिके कोमजुन गेले त्यामुळे पिक विमा नियमानुसार शेतकऱ्यांना नुकसान भरपाई म्हणून 25 टक्के रक्कम देण्याची तरतूद असताना सुद्धा हे सरकार देण्यासाठी तयार नाही ,हे सरकार राज्यांमध्ये कोणती समस्या निर्माण झाली की,कोण आंदोलन करत असेल तर, अधिवेशन जवळ आले की, कोरोचे कारण पुढे करत आहे. कोरोनाच्या तिरडीवर बसून पुढे चालण्याचा काम करत आहेत. आज राज्यामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत, स्पर्धा परीक्षा करणारी विद्यार्थी आत्महत्या करत आहेत, महाराष्ट्र परिवहन खात्यातले कर्मचारी आत्महत्या करत आहेत . शेतकरी, कामगार ,विद्यार्थी, महिला त्यांच्या प्रश्नाकडे लक्ष देण्यासाठी सरकारला वेळ नाही असा घणाघात देखील खोत यांनी केला.
युवा प्रदेशाध्यक्ष पांडुरंग शिंदे म्हणाले, येथील जिल्हा प्रशासन पालकमंत्र्यांच्या तालावर नाचत आहे, पण शेतकऱ्याच्या प्रश्नाकडे लक्ष देत नाही, आम्ही कुष्णूर एमआयडीसी येथील इंडिया मेगा अग्रो च्या विरोधात शेतकऱ्याच्या हक्काच्या दामासाठी मोठा आंदोलन उभं केले, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अर्धनग्न आंदोलन केले पण जिल्हाधिकारी असतील किंवा पालकमंत्री असतील यावर एक शब्द काढला नाही किंवा शेतकऱ्याला न्याय देण्याची भूमिका त्यांची नाही.
स्वतःच्या निवासस्थानावर मोठ्या प्रमाणात अधिकारी खर्च करत आहेत पण जिल्ह्यातले सामान्य लोक रस्त्यावरील खड्डे आणि प्रवास करत आहेत याकडे लक्ष द्यायला त्यांना वेळ नाही .जिल्ह्याचा कारभार अनागोंदी प्रकारे चालू आहे, जिल्ह्यातील एखाद्या एकाधिकारशाही संपून आपल्याला शेतकऱ्याच्या पोरांना आता एकत्र यावं लागेल आणि यांच्या छाताडावर बसून आपले प्रश्न सोडवावा लागेल.
यावेळी तालुका अध्यक्ष विठ्ठल इंगोले, शिवाजी गायकवाड,पांडव मुंगूनाळे,(जिल्हाध्यक्ष) विनोद वंजारे (जिल्हाध्यक्ष), बालाजी ढोसणे, सरपंच संभाजी पांचाळ, उपसरपंच उद्धवराव आबादार यांची प्रमुख उपस्थिति होती.या कार्यक्रमाचे आयोजन नितीन पाटील आबादार यांनी केले, कार्यक्रम यशस्वीरित्या पार करण्यासाठी आनंद आबादार,आनंदा साबळे,गजानन आबादार,दिगंबर आबादार,नागोराव विचकुले,आरव आंबोरे यांनी मोलाचे योगदान दिले.
महत्वाच्या बातम्या
- ‘गोमूत्र अँटीबायोटिक, त्यामुळे संसर्गजन्य आजार बरे होतात’, भाजप खा.साध्वी प्रज्ञा यांचा दावा
- इंधन दर कमी करण्याची किल्ली अजित पवारांकडेच आहे – चंद्रकांत पाटील
- ‘गणेशोत्सव साधेपणाने साजरा करणार असल्याने नवीन निर्बंध नाहीत’ ; उपमुख्यमंत्र्यांनी दिली माहिती
- हरवलेली ‘ओबीसी मंत्रीमंडळ उपसमिती‘ शोधण्यासाठी ‘टास्क फोर्स’ची स्थापना करा – पडळकर
- एकनाथ खडसेंविरोधात ED चे एक हजार पानी आरोपपत्र दाखल, पत्नी आणि जावयाचाही समावेश
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

