Share

तुम्ही अक्षरशः लोकांच्या दुःखावरती मीठ चोळले, सदाभाऊ खोत यांची सरकारवर घणाघाती टीका

Published On: 

मुंबई : रत्नागिरी जिल्ह्यातील खेडमधील पोसरे येथे दरडग्रस्तांना धनादेशाद्वारे मदत देण्यात आली होती. पण ते चेक दुसऱ्याच दिवशी परत घेण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याच मुद्द्यावरून आता ठाकरे सरकारवर टीका होऊ लागली आहे.

रयतचे सर्वेसर्वा आ. सदाभाऊ खोत यांनी देखील याच मुद्द्यावरून ठाकरे सरकारवर घणाघाती टीका केली आहे. आपल्या ट्वीटच्या मध्यातून त्यांनी ही टीका केली आहे. आपल्या ट्वीटमध्ये ते म्हणतात, याला म्हणतात का ठाकरे सरकार व कामगिरी दमदार ? हे तर माहीत होतं शिवसेना प्रसिद्धीसाठी काहीही करू शकते,परंतु एवढ्या खालच्या पातळीवर जाऊन प्रसिद्धी मिळवेल हे कधी वाटलं नव्हत. हे कृत्य करून तुम्ही अक्षरशः लोकांच्या दुःखावरती मीठ चोळले. अनिल परब साहेब जनता तुम्हाला माफ करणार नाही असा घणाघाती हल्ला खोत यांनी केला आहे.

दुसऱ्या बाजूला विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी देखील राज्य सरकार आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री अनिल परब यांच्यावर निशाणा साधला आहे.‘रत्नागिरीचे पालकमंत्री अनिल परब यांनी पूरग्रस्तांना दिलेले चेक काढून घेतले असतील आणि नंतर देणार असं सांगितलं असेल तर हे दुर्दैवी आहे. पालकमंत्री आणि हे राज्य सरकार पूरग्रस्तांची अजून किती थट्टा करणार आहेत?’ असा सवाल दरेकरांनी केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!