🕒 1 min read
मुंबई : राज्यामध्ये सध्या निवडणुकांचं वारं घुमू लागलं आहे. त्यामुळे आरोप-प्रत्यारोपांच्या खेळी रंगलेल्या पाहायला मिळतं आहेत. भाजप पक्षाकडून बारामतीला टार्गेट करणार असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये जुगलबंदी सुरू आहे. बारामतीत भाजपाकडून ज्या पद्धतीने टार्गेट केलं जात आहे, त्याचा काही फरक पडणार नाही. सुप्रिया सुळे यांचं काम बोलतं, त्यामुळे त्या निवडून येतील असा विश्वास अजित पवार यांनी व्यक्त केला होता. अशातच यावर भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी वक्तव्य केलं आहे.
चंद्रकांत पाटील यांचे वक्तव्य-
गेल्या वेळी सुप्रिया सुळे थोडक्यात वाचल्या. यावेळी परमेश्वरही त्यांना वाचवू शकणार नाही, असं म्हणत चंद्रकांत पाटील यांनी अजित पवार यांना चांगलंच सडेतोड उत्तर दिलं आहे. चंद्रकांत पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते.
पुढे ते असंही म्हणाले की, आमचे प्रयत्न सुरु आहेत. प्रयत्न करणारा प्रत्येकजण यश मिळावं यासाठीच प्रयत्न करत असतो. गणरायाकडे काय मागितलं? असा सवाल त्यांना पत्रकारांनी विचारला असता, महाराष्ट्रात सुख, समृद्धी आणि सुरक्षा सर्वसामान्यांना प्राप्त होऊ दे अशी प्रार्थना गणरायाच्या चरणी केली असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं आहे.
दरम्यान, पुण्यात बोलताना अजित पवार म्हणाले की, बारामतीकरांना खूप चांगलं माहितीये की कुणाचं बटण कशा पद्धतीने दाबायचं. ते येत्या निवडणुकीत त्यांचं काम चोखपणे बजावतील याबद्दल माझ्या मनात कोणतीच शंका नाही.
महत्वाच्या बातम्या :
- Ajit Pawar | “कुणाचं बटण कसं दाबायचं, हे चांगलं माहितीये त्यांना”-अजित पवार
- Shivendraraje Bhosale | “उदयनराजे भोसले चवताळल्यासारखे वागतात”;शिवेंद्रराजेंचा उदयनराजेंवर पलटवार
- Queen Elizabeth | इंग्लंडच्या महाराणी एलिजाबेथ दुसऱ्या यांचे निधन
- Eknath Shinde । ‘जबाबदारांवर कठोर कारवाई केली जाईल’; याकूब मेमन कबर प्रकरणी मुख्यमंत्री शिदेंनी दिला इशारा
- AB de Villiers । विराट कोहलीच्या शतकानंतर एबी डिव्हिलियर्सने केला मोठा खुलासा, ट्विटरवर केला गौप्यस्फोट
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
