Share

काँग्रेसने मुख्यमंत्री पदाचा आग्रह धरावा अन्यथा पाठिंबा काढून घ्यावा – रामदास आठवले

Published On: 

मुंबई : फक्त इच्छा व्यक्त करून चालणार नाही तर काँग्रेस पक्षाने मुख्यमंत्री पदाचा आग्रह धरला पाहिजे. राज्यातील महाविकास आघाडी सरकार हे काँग्रेस च्या पाठिंब्यावर तरलेले सरकार आहे. काँग्रेसने पाठिंबा काढला तर महाविकास आघाडी सरकार पडेल. त्यामुळे काँग्रेसने मुख्यमंत्री पदाचा आग्रह धरला पाहिजे जर काँग्रेसला मुख्यमंत्री पद दिले जात नसेल तर काँग्रेसने महाविकास आघाडी सरकारचा पाठिंबा काढावा असे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना केले आहे.

नाना पटोले यांनी नुकतेच राज्यात विधानसभा निवडणुका काँग्रेस स्वबळावर लढेल तसेच मुख्यमंत्री पदाचा चेहरा बनण्यास नाना पटोले यांची तयारी असल्याची ईच्छा नाना पटोले यांनी स्वतः व्यक्त केली आहे. त्यामुळे काँग्रेसने महाविकास आघाडी सरकार मध्ये मुख्यमंत्रीपदाचा आग्रह धरला पाहिजे आणि मुख्यमंत्री पद मिळविले पाहिजे. जर मुख्यमंत्री पद देण्यास महाविकास आघाडी सरकार तयार नसेल तर महाविकास आघाडी सरकारचा पाठिंबा काँग्रेस काढला पाहिजे असे आवाहन रामदास आठवले यांनी नाना पटोले यांना केले आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये सर्वकाही आलबेल नसल्याचे वारंवार समोर येत आहे. नुकत्याच झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिन कार्यक्रमावेळी पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुका शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र लढणार असल्याचा उल्लेख केला होता.

हे सर्व सुरु असताना शिवसेना-राष्ट्रवादी हे महाविकास आघाडीच्या माध्यमातून एकत्र निवडणुका लढवण्यासाठी इच्छुक असल्याचे सांगितले जाते. तर दुसरीकडे कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे आगामी काळातील सर्व निवडणुका कॉंग्रेस स्वबळावर लढणार असे छातीठोकपणे सांगत आहेत. आता नाना पटोले यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर लक्ष असल्याचं समोर आलंय. आपल्याला राज्याचे मुख्यमंत्री बनायचे असल्याची इच्छा नाना पटोले यांनी बोलून दाखवली आहे.

महत्वाच्या बातम्या 

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!