मुंबई: राज्यसभेच्या राज्यातील सहा जागांसाठी झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार प्रफुल्ल पटेल यांना पहिल्या पसंतीची 43, शिवसेनेचे संजय राऊत यांना 41, काँग्रेसचे इम्रान प्रतापगढी यांना 44, तर भाजपचे उमेदवार अनिल बोंडे आणि पीयूष गोयल यांना पहिल्या पसंतीची अनुक्रमे 48 मतं मिळाली आहेत. तर शिवसेनेने सहाव्या जागेसाठी निश्चित केलेले कोल्हापूरचे संजय पवार पराभूत झाले तर भाजपचे धनंजय महाडिक विजयी झाले आहे. यावरच राष्ट्रवादीचे अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
“शिवसेनेच्या संजय पवारांना पहिल्या फेरीत सर्वात जास्त पसंदीची मते आहेत. त्यामुळे भाजपचा फार मोठा विजय म्हणण्याचे कारण नाही. काही अपक्षाच्या जोरावर दगा फटका करणारी ही कपटी खेळी भविष्यात तुमच्या गर्व हरणाला पुरेशी ठरणार.”, असे अमोल मिटकरी यांनी म्हटले आहे.
अखेर रडिचा डाव यशस्वी झाला. अपक्षातील काही मतदारांवर यंत्रणा, धाकदपट शाहिने कपटी राजकारण करण्यात भाजपा यशस्वी झाली असली तरीही त्यांनी एक लक्षात ठेवावे मविआ ची मत सुरक्षित आहेत. त्यात फुट नाही. तुमच्या केंद्रीय यंत्रणा तुमच्या कामी आल्या.२०२४ ला हा
हिशेब चुकता करु.#रडीचाडाव— आ. अमोल गोदावरी रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) June 11, 2022
“अखेर रडिचा डाव यशस्वी झाला. अपक्षातील काही मतदारांवर यंत्रणा, धाकदपट शाहिने कपटी राजकारण करण्यात भाजपा यशस्वी झाली असली तरीही त्यांनी एक लक्षात ठेवावे मविआची मत सुरक्षित आहेत. त्यात फुट नाही. तुमच्या केंद्रीय यंत्रणा तुमच्या कामी आल्या. २०२४ ला हा हिशेब चुकता करु. भाजपने केलेल्या सुडाच्या राजकारणामुळे त्यांचा उद्याचा सुर्य उगवणार नाही.. करारा जबाब मिलेगा!”, असा गंभीर इशारा अमोल मिटकरी यांनी दिला आहे.
महत्वाच्या बातम्या:
- “…त्यांना मतदानासाठी आणणं टाळायला हवं होतं”, रोहित पवारांनी ‘त्या’ प्रसंगावरून व्यक्त केली काळजी
- “बोरू बहाद्दर कारकून आणि ‘ढ’ टीमचे कप्तान तोंडावर आपटले” ; मनसेचा शिवसेनेवर तिखट प्रहार
- उर्फी जावेदचा नवीन लुक ; जोरदार वाऱ्यामुळे ड्रेस सांभाळत अभिनेत्रीची तारांबळ, पहा VIDEO
- “भाजपने नक्कीच जागा जिंकली पण…”, शिवसेनेच्या पराभवानंतर संजय राऊतांची प्रतिक्रिया
- धाकड चित्रपटाच्या अपयशानंतर कंगना रणौत गेली कुटुंबासोबत फिरायला ; पहा PHOTO

