मुंबई : गायक सिद्धू मुसेवाला यांची भरदिवसा निर्घृण हत्या करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार यावेळी 30 राऊंड गोळीबार करण्यात आला. लॉरेन्स बिश्नोई टोळीचा सदस्य असलेल्या लकीने या हत्येची जबाबदारी स्वीकारली आहे. यांच्या मृत्यु नंतर अनेक वेगवेगळ्या बातम्या समोर येत आहेत. यामध्ये आता सिद्धू मुसेवाला वाद्ग्रस्त पंजाबी गायक म्हणून ओळखले जात होते अशी माहिती समोर येत आहे.
सिद्धू मुसेवाला यांनी अनेक पंजाबी गाणी हिट दिली आहेत. पंजाबमध्ये बंदूक संस्कृतीला प्रोत्साहन दिल्याचा आरोपही त्यांच्यावर आहे. त्यांच्या एका गाण्याने पंजाबींना भडकावले होते. त्यामुळे ते बऱ्याच वेळा वादात देखील सापडले आहेत. सिद्धू मुसेवाला यांनी ‘स्केपगोट’ हे गाणे गायले आणि त्या गाण्यामध्ये त्यांनी पंजाबींना देशद्रोही म्हटले होते. त्यांच्या या गाण्याने पंजाबी लोकांमध्ये प्रचंड खळबळ उडवून दिली होती.
सिद्धू मुसेवालाच्या गाण्याला आम आदमीच्या पार्टीने जोरदार विरोध केला होता. आपचे प्रवक्ते नील गर्ग यांनी काँग्रेस पक्षाला पंजाबींना देशद्रोही म्हटल्याबद्दल माफी मागण्यास सांगितले होते. आपच्या एका नेत्याने म्हटले होते की, पंजाबने मनापासून मतदान केले आहे, अशा परिस्थितीत त्यांना देशद्रोही म्हणणे लाजिरवाणे आहे.
महत्वाच्या बातम्या :

