मुंबई: राज्यसभेच्या राज्यातील सहा जागांसाठी सात उमेदवारांमध्ये काल (१० जून) मतदान झाले. अनेक घडामोडी आणि राजकीय नाटकानंतर याचा निकाल लागला. यात राष्ट्रवादीचे उमेदवार प्रफुल्ल पटेल यांना पहिल्या पसंतीची 43, शिवसेनेचे संजय राऊत यांना 41, काँग्रेसचे इम्रान प्रतापगढी यांना 44, तर भाजपचे उमेदवार अनिल बोंडे आणि पीयूष गोयल यांना पहिल्या पसंतीची अनुक्रमे 48 मतं मिळाली आहेत. यावरच राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
“राज्यसभेच्या निवडणुकीत विजयी झालेले मविआचे नवनिर्वाचित खासदार प्रफुल पटेल, संजय राऊत आणि इमरान प्रतापगढि यांच्यासह भाजपच्याही विजयी उमेदवारांचं मनःपूर्वक अभिनंदन! फोडाफोडी आणि दबावाचं राजकारणही या निवडणुकीत दिसलं, हे लोकशाहीसाठी नक्कीच चिंताजनक आहे.”, असे रोहित पवार यांनी म्हटले आहे.
विशेष म्हणजे आमदार लक्ष्मण जगताप जी आणि आमदार मुक्ताताई टिळक या आजारी असल्याने त्यांना त्रास होऊ नये म्हणून मतदानासाठी आणणं टाळायला हवं होतं, पण तरीही त्यांनी अंबुलन्समधून येऊन मतदान केलं, ही कृती मनाला खूप भावली. ते दोघेही लवकरात लवकर बरे व्हावेत, अशी मी प्रार्थना करतो. pic.twitter.com/QWESLimlI1
— Rohit Pawar (@RRPSpeaks) June 11, 2022
पुढे ते म्हणाले की, “विशेष म्हणजे आमदार लक्ष्मण जगतापजी आणि आमदार मुक्ताताई टिळक या आजारी असल्याने त्यांना त्रास होऊ नये म्हणून मतदानासाठी आणणं टाळायला हवं होतं, पण तरीही त्यांनी अंबुलन्समधून येऊन मतदान केलं, ही कृती मनाला खूप भावली. ते दोघेही लवकरात लवकर बरे व्हावेत, अशी मी प्रार्थना करतो.”
महत्वाच्या बातम्या:
- उर्फी जावेदचा नवीन लुक ; जोरदार वाऱ्यामुळे ड्रेस सांभाळत अभिनेत्रीची तारांबळ, पहा VIDEO
- “भाजपने नक्कीच जागा जिंकली पण…”, शिवसेनेच्या पराभवानंतर संजय राऊतांची प्रतिक्रिया
- धाकड चित्रपटाच्या अपयशानंतर कंगना रणौत गेली कुटुंबासोबत फिरायला ; पहा PHOTO
- “वाघाचा कलभूत दिसे वाघा ऐसा…”, राज्यसभा निकालानंतर संभाजीराजेंचे ट्वीट चर्चेत
- ‘या’ राज्यात रेशनचे धान्य मिळणार एटीएम मशीनद्वारे ; वाचा सविस्तर

