🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा :- चंद्रशेखर बावनकुळे यांची तिकीट राज्यात नाही तर दिल्लीत कटली. अदानींच्या प्रकल्पाला मदत न करण्याचा फटका बावनकुळे यांना बसला आहे असा टोला काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना लागवला आहे.
दरम्यान,आगामी विधानसभा निवडणुकीसाठी चंद्रशेखर बावनकुळे यांना भाजपनं जोरदार धक्का दिला आहे. कामठी विधानसभा मतदारसंघातून बावनकुळे यांचा पत्ता कापण्यात आला असून त्यांच्याऐवजी टेकचंद सावरकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. बावनकुळे यांच्या पत्नीला उमेदवारी मिळेल अशी चर्चा होती. मात्र, ती निरर्थक ठरली आहे.
चंद्रशेखर बावनकुळे यांची तिकीट राज्यात नाही तर दिल्लीत कटली. अदानींच्या प्रकल्पाला मदत न करण्याचा फटका बावनकुळे यांना बसला. तसेच अजून एक मोदींच्या उद्योगपती मित्राला मदत केली नाही हे ही दिल्लीत खटकले. भाजपात मोदींच्या उद्योगपती मित्रांचे किती चालतं हे यातून दिसून येते.
— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) October 6, 2019
याच पार्श्वभूमीवर सचिन सावंत यांनी ट्वीट करत म्हटले आहे की, चंद्रशेखर बावनकुळे यांची तिकीट राज्यात नाही तर दिल्लीत कटली. अदानींच्या प्रकल्पाला मदत न करण्याचा फटका बावनकुळे यांना बसला. तसेच अजून एक मोदींच्या उद्योगपती मित्राला मदत केली नाही हे ही दिल्लीत खटकले. भाजपात मोदींच्या उद्योगपती मित्रांचे किती चालतं हे यातून दिसून येते.असे म्हणत त्यांनी चंद्रशेखर बावनकुळे आणि भाजपवर टीका केली.
महत्वाच्या बातम्या
https://twitter.com/Maha_Desha/status/1180745542684434432?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1180745298261315584?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1180742918186795008?s=20
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
