🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा : लोकसभा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या असताना युतीच्या चर्चेचे घोडे काही केल्या पुढे जात नाही. शर्ती आणि अटींच्या गर्तेत भाजप – शिवसेना युती अडकली असल्याने दोन्ही पक्षातील कार्यकर्ते संभ्रमात आहेत. अशात याचा फायदा आता विरोधी पक्षांनी उचलायला सुरवात केली असून कॉंग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी तर थेट शिवसैनिकच कॉंग्रेसला मतदान करतील असा विश्वास व्यक्त केला आहे.
मुंबईत मराठी माणसासह सर्व समाजांचा पाठिंबा काँग्रेसला मिळेल. उद्धवजी राजकीय स्वार्थाकरीता मोदींबरोबर जातील पण यावेळी शिवसैनिकही काँग्रेसला मतदान करेल.मोदींच्या व भाजपाच्या खोटेपणाचा सर्वांनाच वीट आला आहे. भाजपाचे पानिपत निश्चित आहे. मुंबईत काँग्रेस आघाडी ६ ही जागांवर विजय होणार अस ट्विट करून सचिन सावंत यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे.
मुंबईत मराठी माणसासह सर्व समाजांचा पाठिंबा काँग्रेसला मिळेल. उद्धवजी राजकीय स्वार्थाकरीता मोदींबरोबर जातील पण यावेळी शिवसैनिकही काँग्रेसला मतदान करेल.
मोदींच्या व भाजपाच्या खोटेपणाचा सर्वांनाच वीट आला आहे. भाजपाचे पानिपत निश्चित आहे. मुंबईत काँग्रेस आघाडी ६ ही जागांवर विजय होणार— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) February 12, 2019
दरम्यान, शिवसेना भाजप यांच्या युतीचं घोंगडं अजूनही भिजतच आहे. दोन्ही पक्षांमधून कधी स्वबळाची भाषा होते, तर पडद्यामागे एकमेकांना चुचकारण्याचे प्रयत्न होताना दिसतात. शिवसेना भाजपने 50-50 या जागावाटपाच्या सूत्राने युती केली, तर चित्र काय असेल, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.


