टीम महाराष्ट्र देशा : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून मोठ्या प्रमाणात सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेत इनकमिंग सुरू आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत माजी गृहनिर्माण राज्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार सचिन अहीर यांनी हाती शिवबंधन बांधले.
याच दरम्यान, ‘हा निर्णय घेताना मला त्रास झाला. पवारसाहेब कायम माझ्या हृदयात राहतील. पण राजकारणात काही निर्णय घ्यावे लागतात,’ असे राष्ट्रवादी सोडताना सचिन अहिर यांनी भावनिक उद्गार काढले.
दरम्यान, काँग्रेस – राष्ट्रवादीचे अनेक नेते भाजप – सेना युतीत प्रवेश केला आहे. त्यामुळे दिवसेंदिवस भाजप – सेना युतीची ताकद वाढत आहे. तर काँग्रेस – राष्ट्रवादी कमकुवत होताना दिसत आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

