मुंबई : आयपीएल स्पर्धेला सुरुवात होण्यापूर्वी कोलकाता नाईट रायडर्सनं एका खेळाडूचा टीममध्ये समावेश केला आहे. केकेआरचा रिंकू सिंह दुखापतीमुळे पूर्ण सिझनमधून आऊट झाला आहे. रिंकूच्या जागी गुरकिरत सिंहला संघात सामील करून घेतलं आहे. गुरकिरत आयपीएलच्या मागच्या सिझनमध्ये विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा सदस्य होता. या सिझनपूर्वी त्याला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघातून वगळण्यात आले होते. केकेआरची पहिली मॅच 11 एप्रिल रोजी सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध होणार आहे.
केकेआरनं गुरकीरत सिंह मानला 50 लाख या त्याच्या बेस प्राईजमध्ये खरेदी केलं आहे. गुरकिरतचा हा आठवा आयपीएल सिझन आहे. मागच्या वर्षी युएईमध्ये झालेल्या आयपीएल स्पर्धेत त्याला 8 मॅचमध्ये खेळण्याची संधी मिळाली होती. यामध्ये त्याने 71 रन काढले होते. नाबाद 21 हा त्याचा सर्वोच्च स्कोअर होता. त्याला मागच्या सिझनमध्ये 80 पेक्षा कमी बॉल खेळण्याची संधी मिळाली होती. तर रिंकू सिंहनं आयपीएल स्पर्धेत 2017 साली पदार्पण केले. तो आजवर 8 आयपीएल मॅच खेळला आहे.
गुरकिरत हा देशांतर्गत क्रिकेट तसंच आयीएलमधील अनुभवी खेळाडू आहे. त्याने आजवर 41 आयपीएल मॅच खेळल्या आहेत. यामध्ये 21 च्या सरासरीनं 511 रन केले आहेत. केकेआरची पहिली मॅच 11 एप्रिल रोजी सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध होणार आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘निवडणूक आयोग’, ईव्हीएम मशीन प्रकरणावर राहुल गांधींचे दोन शब्दांत ट्विट
- आरसीबीच्या हुकूमी एक्क्याला कोरोनाची लागण
- कोरोनाशी लढा एकट्या सरकारचा नाही तर सर्व जनतेचा – उद्धव ठाकरे
- ‘कोणत्या दबावाखाली भाजप नेत्याची प्रचारबंदी 48 तासांऐवजी 24 तास केली ?’
- गांधीगिरी! आ.सुरेश धस यांनी केला विनामास्क फिरणाऱ्यांचा सत्कार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

