Share

भारतीय संघातील दुखापतीची मालिका संपेना ; ऋतुराज गायकवाड मालिकेतून बाहेर

Published On: 

मुंबई: वेस्ट इंडिज दौऱ्यानंतर भारतीय संघात दुखापतग्रस्त क्रिकेटपटूंची रांग लागली आहे. वेस्ट इंडिज विरुद्ध मालिकेत दीपक चहर आणि स्र्यकुमार यादव दुखापत ग्रस्त झाल्यानंतर आता पहिला सामना मनगटच्या दुखापतीमुळे मुकलेला ऋतुराज गायकवाड टी २० मालिकेतून बाहेर पडला आहे.

पहिल्या टी २० सामन्यात ऋतुराज ऐन सामन्याची आधी मनगट दुखत असल्याची तक्रार करत खेळू शकला नव्हता. त्याची दुखापत गंभीर नसावी अशी आशा चाहत्यांना होती. मात्र त्याची दुखापत वाढल्याने त्याला मालिकेतूनच बाहेर पडावे लागले आहे. यासंबंधी माहिती देताना सांगण्यात आले आहे कि ऋतुराजच्या जागी आता मयंक अग्रवालची संघात वर्णी लागली आहे.

धर्मशाला येथे अंतिम दोन सामने खेळले जाणार असल्याने भारतीय खेळाडू चंदीगड येथे क्वारंटाईनमध्ये आहेत. ऋतुराजच्या दुखापतीने आधीच लांबलचक असलेल्या दुखापतींच्या यादीत भर घातली आहे. ज्यामध्ये सूर्यकुमार यादव, दीपक चहर आणि केएल राहुल दुखापतीमुळे मालिकेपूर्वी बाहेर पडले आहेत. सूर्यकुमार आणि चहर यांच्या जागी कोणीच आले नाही. परंतु मयंक चंदीगड मध्येच असल्याने बीसीसीआयने त्याला संघात घेतले आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!