Share

ग्रामविकास मंत्र्यांनी बांधावर जात शेतकऱ्यांसोबत साजरा केला ‘बैलपोळा’!

Published On: 

औरंगाबाद: पोळा किंवा बैलपोळा हा श्रावण अमावस्या किंवा भाद्रपद अमावास्या या तिथीला साजरा करण्यात येणारा बैलांचा सण आहे. बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा हा एक मराठी सण असून हा विशेषतः विदर्भात भव्य पातळीवर साजरा केला जातो. विदर्भातील सीमेवर असलेल्या मध्य प्रदेश व तेलंगण सीमाभागातसुद्धा हा सण साजरा होतो. ज्यांच्याकडे शेती नाही ते मातीच्या बैलाची पूजा करतात. शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा असलेला हा सण महसूल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी बांधावर जात शेतकऱ्यांसोबत साजरा केला.

शेतकऱ्यांसाठी सदैव कष्ट करणार्‍या बैलांबद्दल कृतज्ञता व्यक्त करणारा सण म्हणजे पोळा. यंदाच्या पोळा सणावर कोरोना सावट दिसून आले. महसुल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी ग्रामीण भागात जाऊन पोळा सण साजरा करणे पसंद केले. पोळा निमित्त राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी पिंपळदरी, वसई, हळदा, वसई वाडी आदी भागात जाऊन साध्या पध्दतीने पोळा सण साजरा करत शेतकऱ्यांना पोळा सणाच्या शुभेच्छा दिल्या.

कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता सर्वांनी लसीकरण करून खबरदारी घ्यावी, कोरोनावर आपण नक्कीच मात करू, येत्या काळात सगळे संकट दूर होऊन सगळीकडे उत्साह, आनंद, चैतन्य, समृद्धी घेऊन येईल असा विश्वास व्यक्त करीत राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी पोळा सणाच्या शेतकऱ्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख देविदास पा. लोखंडे, पालोद गावचे सरपंच नासेर पठाण, उपसरपंच मॅचिंद्र पालोदकर आदींची उपस्थिती होती.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!