Share

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांचा शाहरुख खानला पाठींबा, म्हणाल्या कि…

Published On: 

पुणे : भारतरत्न, गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचं वयाच्या ९३ व्या वर्षी मुंबई मधील ब्रीच कॅन्डी रुग्णालयात काल दिनांक ७ फेब्रुवारी रोजी सकाळी ८:१२ वाजता निधन झाले. गेले २८ दिवस त्या न्यूमोनिया आजराशी झगडत होत्या. अखेर त्यांची प्राणज्योत काल माळवली. काल लाखोंच्या गर्दीने लता मंगेशकर यांना मुंबईतील शिवाजी पार्क येथे शासकीय इतमामात निरोप देण्यात आला. त्यांच्या अंतदर्शनासाठी अनेक क्षेत्रातील मान्यवर उपस्थितीत होते. क्रीडा,संगीत,राजकारण इत्यादी अनेक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, राष्ट्रवादी पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार, सचिन तेंडुलकर, शाहरुख खान, अमीर खान इत्यादी अनेक मान्यवरांनी लता मंगेशकर यांच्या अंत्यविधीला हजेरी लावली होती. बॉलीवुड अभिनेता शाहरुख खान याने त्याच्या व्यवस्थापक पूजासोबत येऊन लता मंगेशकर यांना श्रद्धांजली अर्पण करत आपल्या इस्लाम धर्माप्रमाणे दुआ (पार्थना) केली.

परंतु काही ठिकाणी याची प्रशंसा झाली तर काही ठिकाणी वाद निर्माण झाला. शहारूख खान याने लता मंगेशकर यांच्या पार्थिवावर थुंकले असे काहींचे म्हणणे आहे. परंतु ते थुंकणे नसून फुक मारणे होते. भाजपचे हरयाणाचे पदाधिकारी अरुण यादव यांनी ट्विट करत हा वाद सुरू केला होता. शाहरुख खानच्या या इस्लामी पार्थनेबद्दल अनेक भारतीयांनी त्याला ट्रोल करायला सुरुवात केली तर अनेक जण सामाजिक माध्यमांवरून शाहरुख खानला पाठिंबा दर्शवत होते. त्यातच आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि माजी नगरसेवक रुपाली ठोंबरे पाटील यांनी शाहरुख खानच्या कालच्या प्रकरणावर वक्तव्य केले आहे.

शाहरुख खानला पाठिंबा दर्शवत त्यांनी ”जाती धर्माच्या पलीकडे जाऊन आपण कधीतरी माणूस होऊया” अश्या शब्दात त्यांनी शाहरुख खानला पाठिंबा दिला. इस्लाम नुसार जेव्हा कोणी व्यक्ती आजारी असते किंवा तिला नजर लागली असते. तेव्हा एक दुआ बोलून झाल्यावर ती दुआ किंवा प्रार्थना त्या व्यक्तीच्या शरीरपर्यंत पोहोचण्यासाठी फुक मारली जाते. तसेच त्याबद्दल अजून माहिती अशी आहे की, इस्लाम मध्ये काही लोक फुक मारून जादू करण्याचे काम करतात, त्यातून मुक्ती मिळविण्यासाठी दुआ करून फुक मारली जाते. त्यामुळे शाहरुख खानने काल जे केले त्यात काहीच गैर नाही असे पण त्या म्हणाल्या.

      महत्वाच्या बातम्या:    

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!