🕒 1 min read
मुंबई: जवळपास दोन महिन्यांहून अधिक काळ सुरु असलेल्या एसटी संपबाबत आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृहावर आज बैठक होणार आहे. मात्र या बैठकीवरूनच भाजप नेते अतुल भातखळकर (BJP leader Atul Bhatkhalkar) यांनी पवारांवर निशाना साधत शरद पवारांकडे महाराष्ट्र शासनाचे असे कोणते संविधानीक पद आहे ज्यामुळे ते एसटी संपाबाबत सह्याद्री अतिथीगृहावर बैठक घेणार आहेत. अशी टीका केली होती, यावरच आता राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे (Rupali Patil Thombre) यांनी प्रतिउत्तर दिले आहे.
‘देशाचे नेते शरद पवार यांचे संविधानिक पद विचारणाऱ्या अडगळीला पडलेल्या सत्तापिपासुना मानसिक उपचाराची गरज आहे. पद आणि पत समजून घेण्यासाठी “अतुल” नीय कार्य करावं लागतं. असा खोचक टोला रुपाली पातळ ठोंबरे यांनी अतुल भातखळकर यांना लगावला आहे.
देशाचे नेते शरद पवार साहेबांचे संविधानिक पद विचारणाऱ्या अडगळीला पडलेल्या सत्तापिपासुना मानसिक उपचाराची गरज ; पद आणि पत समजून घेण्यासाठी "अतुल" नीय कार्य करावं लागतं …
— Rupali patil thombare (@Rupalispeak) January 10, 2022
अतुल भातखळकर काय म्हणाले होते?
‘शरद पवार (NCP president Sharad Pawar) यांच्या उपस्थितीत एसटी संपाबाबत मह्त्त्वाची बैठक सह्याद्री अतिथीगृहावर आज दुपारी १२.३० वाजता बैठक होणार आहे. मात्र शरद पवारांकडे महाराष्ट्र शासनाचे असे कोणते संविधानीक पद आहे ज्यामुळे ते एसटी संपाबाबत सह्याद्री अतिथीगृहावर बैठक घेणार आहेत? मुख्यमंत्री काय करतायत?’ असे ट्वीट करत अतुल भातखळकर यांनी शरद पवारांना टोला लगावला आहे.
दरम्यान वारंवार आवाहन करूनही संपावरील कर्मचारी कामावर परत येत नसल्याने आता महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने खासगी चालकांची भरती प्रक्रिया सुरू केली असून रविवारी नागपूर विभागात ६ चालकांची नियुक्ती करण्यात आली. त्यामुळे संप सुरू झाल्यानंतर पहिल्यांदाच चंद्रपूर, अमरावती येथे फेऱ्या पाठविण्यात आल्या आहेत. तर अजूनही अनेक कर्मचाऱ्यांना नोटीशी पाठवण्यात येत आहेत. दरम्यान आज होणाऱ्या बैठकीत यावर काही ठोस पर्याय निघण्याची शक्यता आहे.
महत्वाच्या बातम्या:
- नाना पटोलेंचा महिला काँग्रेस पदाधिकाऱ्यांना सबुरीचा सल्ला; आता लक्ष निर्णयाकडे..!
- ‘आघाडीचे सरकार आल्यापासून भाजपला सापत्न वागणूक’, आशिष शेलारांनी व्यक्त केली खंत
- ‘टेक फॉग’च्या खुलाश्याने भाजपचे चाल-चरित्र बेनकाब झाले; नितीन राऊतांचा टोला
- एसटी कामगार संघटनेची मान्यता रद्द, काँग्रेस इंटकच्या लढ्याला यश..
- सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाईंना कोरोनाची लागण
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
