Share

भाजपने पुणेकरांच्या पैशाला चुना लावला ; रूपाली पाटील ठोंबरे आक्रमक

Published On: 

पुणे : येत्या काहीच दिवसात पुणे महानगरपालिकेच्या निवडणूका होणार आहेत. सत्ताधारी भारतीय जनता पक्ष आणि प्रमुख विरोधी पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांच्यात चांगलाच कलगीतुरा रंगायला सुरुवात झाली आहे. आगामी पुणे महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आणि काही विकासकामांचे उद्घाटन करायला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे ६ मार्च रविवार रोजी पुण्यात येणार आहेत.

यावरूनच राष्ट्रवादी काँग्रेसच्या आक्रमक नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी पुणे शहर भारतीय जनता पक्षावर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे पुणे दौऱ्यावर येणार आहेत.  या पार्श्वभूमीवर भाजपने विकासकामांना वेग दिला आहे. यावरूनच राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी पुणे शहर भाजपावर आणि पुणे महानगरपालिकेवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे.

“देशाचे प्रधानमंत्री पुणे शहराच्या दौऱ्यावर येणार आहेत, म्हणून पुणे महानगरपालिकेतर्फे निविदा न काढताच कामाला सुरुवात करण्यात आली आहे. गेल्या ५ वर्षात भाजपला आजिबात काम करता आली नाहीत.  गेल्या ५ वर्षात पुणेकरांच्या पैशाला भाजपने नुसता चुना लावला. प्रधानमंत्री पुणे शहराच्या दौऱ्यावर येणार आहेत म्हंटल्यावर तरी भाजपने कायदेशीर निविदा काढून कामाला सुरुवात करायला हवी होती” अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली  पाटील ठोंबरे यांनी केली आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!