Share

मनसेच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी सत्ताधारी आणि विरोधकांवर साधला निशाणा, म्हणाल्या…

Published On: 

पुणे – भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर आर्थिक गैरव्यवहाराचे गंभीर आरोप केले आहेत. दरम्यान, या घोटाळ्यांची माहिती देण्यासाठी तसेच काही ठिकाणांची पाहणी करण्यासाठी सोमय्या कोल्हापूरकडे रवाना होण्याआधीच काल कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांनी सोमय्या यांना नोटीस बजावली आणि त्यांना जिल्ह्यात येण्यास मनाई करण्यात आली. तरीही कोल्हापूरकडे निघालेल्या सोमय्या यांना अखेर कराडमध्ये रेल्वेतून उतरवण्यात आले.विशेष म्हणजे काल सोमय्या यांच्या मुलुंडमधील घराजवळ मोठ्या प्रमाणावर पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला होता.

आज त्यांनी कराडमध्ये पत्रकार पारिषद घेत पुन्हा एकदा महाविकास आघाडीवर हल्लाबोल केला आहे. दरम्यान, एका बाजूला अनेक समस्यांचा सामना राज्यातील नागरिकांना करावा लागत असताना दुसऱ्या बाजूला सुरु असणाऱ्या या  राजकीय नाट्यावर आता मनसेने भाष्य केले आहे.

https://twitter.com/Rupalipatiltho1/status/1439830587129303052?s=20

मनसेच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी ट्वीट करत सत्ताधारी आणि विरोधकांवर निशाणा साधला आहे. महाराष्ट्रातील जनता मेली, गेली तरी चालेल भाजप आणि महविकास आघाडी तमाशा चालूच. लोकांच्या प्रश्नांचे काही घेणे देणे नाहीच मरा एकदाचे अशी भूमिका घातक. महाराष्ट्रासाठीपर्याय मनसेच आहे ,की त्यांची बांधिलकी फक्त जनतेशी आहे असं त्यांनी आपल्या ट्विट मध्ये म्हटले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!