पुणे – भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर आर्थिक गैरव्यवहाराचे गंभीर आरोप केले आहेत. दरम्यान, या घोटाळ्यांची माहिती देण्यासाठी तसेच काही ठिकाणांची पाहणी करण्यासाठी सोमय्या कोल्हापूरकडे रवाना होण्याआधीच काल कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांनी सोमय्या यांना नोटीस बजावली आणि त्यांना जिल्ह्यात येण्यास मनाई करण्यात आली. तरीही कोल्हापूरकडे निघालेल्या सोमय्या यांना अखेर कराडमध्ये रेल्वेतून उतरवण्यात आले.विशेष म्हणजे काल सोमय्या यांच्या मुलुंडमधील घराजवळ मोठ्या प्रमाणावर पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला होता.
आज त्यांनी कराडमध्ये पत्रकार पारिषद घेत पुन्हा एकदा महाविकास आघाडीवर हल्लाबोल केला आहे. दरम्यान, एका बाजूला अनेक समस्यांचा सामना राज्यातील नागरिकांना करावा लागत असताना दुसऱ्या बाजूला सुरु असणाऱ्या या राजकीय नाट्यावर आता मनसेने भाष्य केले आहे.
https://twitter.com/Rupalipatiltho1/status/1439830587129303052?s=20
मनसेच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी ट्वीट करत सत्ताधारी आणि विरोधकांवर निशाणा साधला आहे. महाराष्ट्रातील जनता मेली, गेली तरी चालेल भाजप आणि महविकास आघाडी तमाशा चालूच. लोकांच्या प्रश्नांचे काही घेणे देणे नाहीच मरा एकदाचे अशी भूमिका घातक. महाराष्ट्रासाठीपर्याय मनसेच आहे ,की त्यांची बांधिलकी फक्त जनतेशी आहे असं त्यांनी आपल्या ट्विट मध्ये म्हटले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- सोमय्यांच्या रडावर आता ठाकरे कुटुंबीय; अलिबागला जाऊन रश्मी ठाकरेंच्या बंगल्यांची पाहणी करणार
- मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप करून किरीट सोमाय्यांवर होत असलेली कारवाई थांबवायला हवी होती – फडणवीस
- ‘सोमय्या फक्त साधन, खरे मास्टरमाईंड चंद्रकांत पाटीलच’, हसन मुश्रीफांचा आरोप
- चंद्रकांत पाटलांकडून मला भाजपात येण्यासाठी ऑफर; हसन मुश्रीफांचा गौप्यस्फोट
- कुटुंबांवर केलेले आरोप बिनबुडाचे, सोमय्यांच्या सीए पदवीवरच मला शंका-हसन मुश्रीफ


