नवी दिल्ली : माजी पंतप्रधान तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मनमोहन सिंग यांची तब्येत खालावलीअसल्याने त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काही काळानंतर प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली. परंतु सध्या त्यांच्या निधनाची अफवा सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. मात्र याबाबत मनमोहन सिंह यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती एम्सच्या डॉक्टरांनी दिली आहे.
या वेळी अनेक नेते मनमोहन सिंग यांच्या भेटीला गेले. त्यांची विचारपूस केली. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविय हे देखील मनमोहन सिंगांच्या भेटीला गेले होते. यावेळी रुग्णालयातील डॉ. सिंग यांचा फोटो प्रचंड व्हायरल झाला होता. यावरूनत्यांच्या कुटुंबीयांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली होती. सध्या भारतीय नागरिक तसेच राजकीय लोक त्यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी यासाठी प्रार्थना करत आहेत.
दरम्यान, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग हे ८८ वर्षांचे आहेत. त्यांच्या दोन बायपास शस्त्रक्रिया देखील झाल्या आहेत. त्यांची पहिली शस्त्रक्रिया १९९० मध्ये युनायटेड किंगडममध्ये करण्यात आली. तर २००९ मध्ये त्यांची दुसरी बायपास शस्त्रक्रिया एम्समध्ये करण्यात आली.
महत्त्वाच्या बातम्या
- उशिरा का होईना आलं शहाणपण! पाकिस्ताननं जर्सीवर लिहिलं भारताचं नाव
- सिंघू बॉर्डरवर हत्या करणारा सरवजीत म्हणतो, “मला अजिबात पश्चाताप होत नाही”
- ‘अजित पवार आणि त्यांच्या निकटवर्तीयांची बुधवारी आणखी एक पोलखोल करणार’
- मोदींची घोषणा! अयोध्येच्या तीर्थयात्रेसाठी भाजप सरकार ५० हजारांची आर्थिक मदत करणार
- ‘नातेवाईकांचीही चौकशी, त्यांना त्रास देणे हे बरोबर नाही’, गृहमंत्री वळसे पाटलांची प्रतिक्रिया
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
