Share

पुण्यात पुन्हा लॉकडाऊनच्या अफवा? महापौर म्हणाले…

Published On: 

पुणे : राज्यात गेले ५ महिन्यांहून अधिक काळ कोरोनाने हाहाकार माजवला आहे. याकाळात अनेक मंत्री, लोकप्रतिनिधी ते बॉलिवूड स्टार्स देखील कोरोनाच्या विळख्यात सापडले. तर, या रोगावर प्रतिबंध म्हणून लॉकडाऊन करण्यात आला होता. यानंतर आता अनलॉक-४ ची प्रक्रिया सुरु झाली असून जनजीवन पूर्व पदावर येत आहे.

याकाळात मात्र पुण्यातील कोरोना रुग्ण वाढीने नवनवे उच्चांक गाठले असून प्रशासनाचा ढिसाळ कारभार देखील समोर आला आहे. दरम्यान, पुण्यातील वाढत्या रुग्णसंख्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी केंद्रीय मंत्री प्रकाश जवडेकरांपासून जिल्ह्याचे पालकमंत्री व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह जिल्हाधिकारी आणि दोन्ही महानगरपालिकेचे महापौर, आयुक्त, आमदार, खासदार यांच्या बैठका या काळात पार पडत असून योग्य उपाययोजना राबवण्याचे आदेश प्रशासनाला देण्यात आले आहे.

पुणे शहरात गेल्या काही दिवसात पुन्हा लॉकडाऊन होणार अशा आशयाचे मेसेज व्हायरल होत होते. त्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण होत असून खुद्द महापौरांनी खुलासा केला आहे. तसेच अफवा असलेले संदेश पसरवु नये असे आवाहन देखील पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केले आहे.

” पुणे शहरात पुन्हा एकदा लॉकडाऊन होणार असल्याची माहिती वृत्तवाहिन्यांच्या जुन्या बातम्यांच्या क्लिप्स व्हायरल करुन पसरवली जात आहे. या माहितीत कोणतेही तथ्य नसून पुणे महापालिका आणि प्रशासनाच्या पातळीवर असा कोणताही विचार नाही. आपल्यास असे संदेश आल्यावर ते पुढे पाठवण्याचे टाळावे. ” असे ट्विट मुरलीधर मोहोळ यांनी केले असून नागरिकांनी भयभीत होण्याचे कारण नाही.

 

महत्वाच्या बातम्या:-

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!