Share

आठवलेंकडे कोणी पाहत नाही, प्रकाशझोतात येण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरु आहेत ; अनिल परबांचा टोला

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : अभिनेत्री कंगना रणौत विरुद्ध शिवसेना वाद गेले काही दिवसात प्रचंड टोकाला गेलेला दिसून आला. यानंतर, महापालिकेने कंगनाच्या अनधिकृत कार्यालयावर कारवाई करत तोडकाम केले. तर, ही कारवाई कंगनाने सुशांत सिंह राजपूत प्रकरणी मुंबई पोलीस व व्यवस्थेवर आवाज उठवल्यानंतर राजकीय सुडबुद्धीने केल्याचा आरोप कंगना समर्थकांनी केला होता.

यासर्व घटनेनंतर काल रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष व केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी कंगना रणौतच्या घरी जाऊन भेट घेतली. यावरून आता परिवहन मंत्री अनिल परब यांनी रामदास आठवले यांच्यासह भाजप, रिपाइं, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर निशाणा साधला आहे.

“सध्या रिपाइं अध्यक्ष रामदास आठवले यांच्याकडे कुणी पाहत नाही, त्यामुळे प्रकाशझोतात येण्यासाठी ते करत आहेत. भाजपने त्यांना अडगळीत टाकलं आहे. कंगनावर कारवाई झाली असेल तर मग तिने केलेल्या बेकायदेशीर कामाला भाजप, रिपाइं आणि राज्यपालांचे समर्थन आहे का?” असा सवाल देखील अनिल परब यांनी केला आहे.

कंगनाच्या भेटी नंतर रामदास आठवले काय म्हणाले?

काल कंगनाने, माझा अपमान झाल्याचं सांगितलं. जेवढं जादा बांधकाम झालं होतं, तेवढंच तोडायला हवं होतं, कोर्टात जाऊन नुकसान भरपाई मागणार असल्याचं कंगनाने म्हटलं असल्याचं, आठवले यावेळी म्हणाले म्हणाले आहेत.मुंबई सर्व जाती-धर्माच्या सर्व लोकांची आहे. मुंबईत राहण्याचा सर्वांना अधिकार आहे. रिपाई कंगनासोबत आहे. जाणूनबुजून त्रास देण्याचं काम सुरु आहे. बदल्याच्या भावनेतून कारवाई असल्याचं, आठवले म्हणाले. या मुद्द्याशिवाय इतर अनेक मुद्यांवर चर्चा झाल्याचं आठवलेंनी सांगितलं. तसंच, कंगना आरपीआयमध्ये आल्यास १०० टक्के स्वागत करेन, तर भाजपमध्ये आल्यास ५० टक्के स्वागत करेन, असंही ते म्हणाले.

महत्वाच्या बातम्या:-

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!