Share

पुण्यात ऑक्सिजनचा तुटवडा,अजितदादा अधिकाऱ्यांवर भडकले

Published On: 

मुंबई: मागील काही दिवसांपासून पुण्यात आरोग्य व्यवस्थेचे धिंडवडे निघाले आहेत.कोरोना रुग्णांना मिळणारी आरोग्य व्यवस्था अतिशय निकृष्ट दर्जाची आहे. पत्रकार पांडुरंग रायकरांच्या निधनानंतर पालकमंत्री अजित पवारांना मोठ्या प्रमाणात टिकेला सामोरं जावं लागलं होतं. पुण्यात ऑक्सिजनचा पुरवठा कमी पडल्याने पालकमंत्री अजित पवार संबंधित अधिकाऱ्यांवर भडकले आहेत.

उपमुख्यमंत्री पवार यांच्या उपस्थितीत करोनाच्या सद्यस्थितीचा आढावा विभागीय आयुक्त कार्यालयात घेण्यात आला. जम्बो सेंटर विषयी सतत तक्रारी येत आहेत; तसेच ऑक्सिजनच्या पुरवठ्याअभावी रुग्णांचे हाल होत आहेत. या पार्श्वभूमीवर झालेल्या या बैठकीमध्ये उपमुख्यमंत्री पवार यांनी सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांना फैलावर घेतले.

‘आता खूप झाले, यापुढे तक्रारी आल्यास अधिकाऱ्यांची हयगय केली जाणार नाही. विभागीय आयुक्त, पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त, जिल्हाधिकारी यांनी एकत्र येऊन नियोजन करावे आणि परिस्थिती नियंत्रणात आणावी’ असेही उपमुख्यमंत्री पवार म्हणाले.

जमाबंदी आयुक्त एस चोक्कलिंगम यांनी अन्य राज्यांमध्ये ‘जनता कर्फ्यू’ मोठ्या प्रमाणात राबविण्यात येत असल्याचे बैठकीत निदर्शनास आणून दिले. त्यावर उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, ‘आवश्यकता भासल्यास ‘जनता कर्फ्यू’ करा. मात्र हे करताना नागरिकांना त्रास आणि व्यापाऱ्यांचे नुकसान होणार नाही, याची खबरदारी घेण्यात यावी’

महत्वाच्या बातम्या:

मराठा आरक्षण: सरकारने गांभीर्य दाखवले नाही तर रस्त्यावर उतरू ; शिवेंद्रराजेंचा इशारा

सार्वजनिक स्वच्छतागृहास कंगना राणावतचे नाव; शिर्डीतील शिवसैनिक आक्रमक

तर आम्ही प्रियांका गांधींचा बंगला पाडू- भाजप

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!