🕒 1 min read
बीड : आज भारतीय जनता पक्षाच्या खासदार प्रितम मुंडे यांचा वाढदिवस आहे. यानिमित्त विविध क्षेत्रांमधून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. या खास दिवशी त्यांची बहिण तथा भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनीही प्रितम यांना खास शुभेच्छा दिल्यात. सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्यात. ”लहान माझी बाहुली तिची मोठी सावली…इतकी एकरूप की जणू सावली… वाढदिवसाचे खूप आशिर्वाद प्रीतम तू नेहमी सुखी रहा..” अशा सदिच्छा पंकजा यांनी दिल्यात.
https://www.facebook.com/PankajaGopinathMunde/posts/3744646738954193
बीडच्या भारतीय जनता पक्षाच्या खासदार डॉ.प्रितम मुंडे यांचा १७ फेब्रुवारी रोजी वाढदिवस आहे. दरवर्षी त्यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हाभरात विविध कार्यक्रम घेतले जातात. तसेच मोठ्या उत्साहात खा.मुंडे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात येतो. यानिमित्त मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. मात्र, यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर माझा वाढदिवस साजरा करू नका असे आवाहन मुंडे यांनी सोशल मीडियाद्वारे केले आहे. याबाबत त्यांनी एक फेसबूक पोस्ट लिहिली आहे.
कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होऊन परिस्थिती गंभीर होत आहे. या पार्श्वभूमीवर माझा वाढदिवस साजरा करू नका. शुभेच्छा स्वीकारण्यासाठी मी मुंबई किंवा बीड कार्यालयात उपलब्ध नसेल. शुभेच्छा स्वीकारण्यासाठी मी फोन तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून उपलब्ध आहे अशी माहितीही खा.मुंडे यांनी दिली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘जवळजवळ बाटलीबंद होत आलेले कोरोनाचे भूत पुन्हा बाहेर येते की, काय ?’
- कुमारस्वामींनंतर आता सिद्धारामैय्यांचा देखील राम मंदिराला देणगी देण्याला विरोध
- टूलकिट प्रकरणात नवनवीन नावांचा समावेश; अनिता लाल पोलिसांच्या रडारवर
- सलग नवव्या दिवशी इंधन दरवाढ कायम; सर्वसामान्य चिंतेत !
- इंग्लंड की कुटाई हो गई ! ‘या’ खेळाडूकडून टीम इंडियाच अभिनंदन !
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
