Share

19 फेब्रुवारीला शिवसेना भवनासमोर जमा होऊन मराठा क्रांती मोर्चा शिवजयंती साजरा करणार

Published On: 

🕒 1 min read

मुंबई- कोरोना थोडासा कमी झाल्यानंतर राजकीय पक्ष येत्या स्थानिक निवडणूक लक्षात घेता पुन्हा जोमानं तयारीला लागल्याचं दिसून येत आहे.राज्यात विविध पक्षांकडून पक्षाला अधिक बळकटी देण्यासाठी विविध यात्रांचं व कार्यक्रमांचं नियोजन केलं जात आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व मंत्री जयंत पाटील यांच्या नेतृत्वात काही दिवसांपूर्वीच राज्यभरात परिवार संवाद यात्रा काढण्यात आली होती. यावेळी मोठ्या प्रमाणात गावोगावी कार्यकर्त्यांचे मेळावे देखील घेण्यात आले. यानंतर, आता शिवसेना देखील पक्षबांधणीसाठी सक्रिय झाल्याचं दिसून येत आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत काल शिवसेनेची वर्षा या शासकीय निवासस्थानी बैठक पार पडली.या बैठकीला शिवसेनेचे अनेक ज्येष्ठ नेते, मंत्री, आमदार, खासदार आणि राज्यातील सर्व जिल्हा प्रमुख, जिल्हा संपर्कप्रमुख उपस्थित होते. या बैठकीत राज्यभरात शिवसेना ही शिवसंपर्क अभियान राबवणार असल्याचं समोर येत आहे.

दरम्यान,राजकीय पक्षांचे कार्यक्रम धुमधडाक्यात होत असताना दुसरीकडे कोरोनाचे संकट असल्याचे सांगत राज्यात शिवजयंती साठी निर्बंध घातले गेले आहेत.अनेक ठिकाणी याआधीच शिवभक्तांकडून विविध कार्यक्रमांच्या आयोजनाची तयारी करण्यात आली होती मात्र ऐनवेळी गृहविभागानं आदेश बजावून शिवजयंती साजरी करण्यावर निर्बंध घातल्यामुळे शिवभक्तांच्या आनंदावर विरजण पडले आहे.

सरकारने शिवजयंतीला फक्त १०० लोकांना उपस्थित राहण्याची परवानगी दिली आहे.१०० लोकांच्या उपस्थितीला परवानगगी देण्यात आली असली तरी इतर निर्बंध मात्र राज्य सरकारने कायम ठेवले आहेत.दरम्यान, शिवजयंतीवर जाणीवपूर्वक निर्बंध लादले जातात असं म्हणतं मराठा क्रांती मोर्चाने सेना भवन समोर सरकारच्या निषेधार्थ फलकबाजी केली. तसेच 19 फेब्रुवारीला दुपारी 12 वाजता मोठ्या संख्येने शिवप्रेमी शिवसेना भवनासमोर जमा होऊन शिवजयंती साजरा करणार असल्याचा इशारा ही सरकारला मराठा क्रांती मोर्चाने दिला.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!